चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसी कर्मचारी जागृती सभांचे होणार आयोजन

0
34

चंद्रपूर,दि.०२ः-इतर मागासप्रवर्ग(ओबीसी)समाजातील कर्मचारी,अधिकारी वर्गामध्ये राज्यघटनेने ओबीसी प्रवर्गाला दिलेल्या अधिकाराची जाणिव जागृती करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यात ओबीसी जागृती सभांचे आयोजन करण्याचा निर्णय आज रविवार(दि.०२)झालेल्या बैठकीत घेण्यात आला.राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून अधिकारी कर्मचारी यांच्यासमोरील भविष्यातील आवाहने यावर जिल्ह्यातील ओबीसी कर्मचारी अधिकारी यांच्याबैठकीचे आयोजन करण्यात आले होते.त्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला.बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर,उपाध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर,प्रा.विनायकारव बांदुरकर,शिक्षण विस्तार अधिकारी शिवणकर आदी मंचावर उपस्थित होते.यावेळी या सर्वांनी ओबीसी विषयी माहिती आणि अधिकारी कर्मचारीवर्गावर होत असलेल्या अन्यायाची जाणिव करुन दिली.बैठकीला
रमेश ताजने,बंडू भोगेकर, देवराव दिवसे, सुरेश गिलोरकर,सतिश बावणे,मनोज गौरकार, कालिदास येरगुडे,जे.डी.पोटे,राजु लांजेवार,अरुन वाकुलकर,संजय पडोले,संजय निकेसर,ओमदास तुरानकर,रामदास सरडे,शाम लेंडे,प्रदिप पावडे, धनपाल फटिंग आदींसह मोठ्याप्रमाणात कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.बैठकिचे संचालन रमेश ताजणे यांनी केले तर आभार लांजेकर यांनी मानले.