मुख्यमंत्री फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख ठाकरेच्या हस्ते पोहरादेवी येथे आज विकास कामांचे भूमिपूजन

0
28
  • नंगारारुपी प्रदर्शन केंद्रासह इतर कामांचा समावेश
  • २५ कोटी रुपये किंमतीचा आराखडा

वाशिम, दि. ०२ :  जिल्ह्यात पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज मंदिर परिसराजवळ पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत २५ कोटी रुपये किंमतीच्या विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज, ३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

यावेळी वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, परिवहन व खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते, वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, नगरविकास व गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार संजय धोत्रे, खासदार भावना गवळी, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोहरादेवीच्या सरपंच लक्ष्मीबाई खंडारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.भूमिपूजन होत असलेल्या कामांमध्ये नंगारारुपी प्रदर्शन केंद्र, भक्तनिवास इमारत, प्रवेशद्वार व आवार भिंत, अंतर्गत रस्ते बांधकाम, बगीचा, तांडा व जमीन सुशोभिकरण, वाहनतळ व्यवस्था, विद्युतीकरण व खुले सभागृह यासह इतर कामांचा समावेश आहे.