कोतवालांच्या बेमुदत कामबंद आंदोलनाला आविस कडून जाहीर पाठिंबा

0
12

आविसं पदाधिकाऱ्यांनी दिली उपोषण मंडपाला भेट

सिरोंचा,दि.03..राज्यभरात कोतवालांनी सहावा वेतन आयोगाच्या स्वीकृत शिफारशीनुसार चतूर्थ श्रेणी दर्जा देऊन सेवेत कायम करण्याची मागणी घेऊन नाशिक ते सिरोंचा पर्यंत 19 डिसेंबर पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले.सिरोंचा तालुक्यातील सर्व कोतवाल कर्मचाऱ्यांनी येथील तहसिलदार कार्यालयासमोर 26 डिसेंबर पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले.
आज सिरोंचा येथील कोतवालांच्या आंदोलन मंडपाला आविसचे तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, आविस सल्लागार रवी सल्लमवार, बिरा आत्राम, चम्मकारी गट्टू शिवनारायण, समय्या कोंडगोरला,पत्रकार वसंत तोकला आदींनी भेट देऊन कोतवाल कर्मचाऱ्यांची समस्या जाणून घेतले.
कोतवाल कर्मचाऱ्यांची मागणी रास्त असून राज्य सरकारने राज्यातील सर्व कोतवाल कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणी दर्जा देऊन सेवेत कायम करण्याची मागणी रास्त असल्याने या मागणीला आदिवासी विद्यार्थी संघ शाखा सिरोंचा कडून जाहीर पाठिंबा दर्शवित जर सरकारने कोतवालाची मागणी लवकर न सोडविल्यास आदिवासी विद्यार्थी संघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कोतवालांसोबत आंदोलनात सहभागी होऊन तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे यावेळी आविस पदाधिकाऱ्यांनी कोतवाल कर्मचारी बांधवांना आश्वासन दिले.