उज्वला गॅस योजना मोदी सरकारचा चमत्कार : आमदार चरण वाघमारे

0
54
सालई खुर्द(मोहाडी)दि.03 : येथील  ग्रामपंचायत कार्यालयात  गावातील गरजू लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत ४० गॅस कनेक्शनचे वाटप आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.
 ग्रामपंचायत सभागृहात आयोजित गॅस कनेक्शन वितरण समारंभाप्रसंगी पंचायत समिती सदस्य किरण भैरम, सरपंच सत्वशिला बन्सोड, अशोक पटले तंटामुक्त अध्यक्ष, माजी सरपंच जगदीश शेंडे, ग्रा.स.सदस्य छानदेव ठाकरे, मा. सरपंच नंदलाल लिल्हारे,  प्रल्हाद निमकर, किशोर भैरम, नितीन लिल्हारे, श्रीकांत बन्सोड, ईश्वर लिल्हारे, भीमा ठाकरे, प्रविण लिल्हारे, सुरेश मांढरे, रमेश कोहरे, जवाहर लिल्हारे, मुन्ना अटराहे, भाऊलाल सव्वालाखे, ईश्वर दमाहे, ग्रा. प. सदस्य व महिला लाभार्थी व गावकरी उपस्थित होते.
गॅस वितरण प्रसंगी उपस्थित गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना आमदार चरण वाघमारे यांनी, शासनाच्या लोकोपयोगी योजनांचा लाभ जास्तीतजास्त गावकऱ्यांना व्हावा या हेतुने शासनाच्या वतीने शर्थीचे प्रयत्न केल्या जात आहे, तळागाळातील लोकांपर्यंत योजना पोहचावी हे शासनाचे उद्देश आहे, भाजप सरकारच्या काळात विकासाची गंगा वाहत आहे, उज्वला गॅस योजना मोदी सरकारचा चमत्कार आहे, यामुळे सर्व गोर गरिबांना उज्वला गॅस योजनेचा लाभ मिळत आहे.सर्व सामान्य नागरिक सरकारच्या कामकाज पाहून आनंदी आहे, विरोधक सर्वसामान्य माणसाची दिशाभुल करीत आहे.तुमसर मोहाडी तालुक्याकरिता निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार चरण वाघमारे यांनी गॅस कनेक्शनचे वाटपाच्या कार्यक्रमात दिली. गॅस वितरक यांनी, गॅस पेटविण्याच्या तंत्राबद्दल विस्तृत माहिती दिली. याप्रसंगी ४० लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी गॅस वितरक एजन्सी उके तसेच गावातील महिला व पुरुष मंडळी यांनी सहकार्य केले.