फुले वाडा येथे शेख आणि साळुंखे आंतरधर्मीय सत्यशोधक विवाह संपन्न

0
13

पुणे,दि.03- सत्यशोधक विवाह केंद्रातर्फे प्रा.प्रतिमा परदेशी यांनी आज दि.3डिसेंबरला पुणे येथील अमर शेख(मुसलमान) आणि बारामती येथील सोनाली साळुंखे (मराठा) यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा उत्साहात पार पडला.सदर वधु वर उच्च शिक्षण घेतलेले असून ते दोघेही केंद्रीय लोकसेवा आयोग परिक्षेचा( upsc) अभ्यास करीत आहेत.यावेळी परदेशी म्हणाल्या की हा विवाह महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना अभिप्रेत असलेल्या सत्यशोधक पद्धतीने होत असल्याने अनेक नाहक खर्चना फाटा देता येतो.कोणताही मानपान हुंडा घेतला जात नाही,याला वेळ काळ न पहाता कोणतीही सोयीची वेळ पाहून विवाह करता येतो .या विवाहसाठी आता तरुण पिढी 21व्या शतकात पुढे येत आहे ही आनंदाची गोष्ट आहे.आता सर्व समाजा ने हे लक्षात घेऊन स्वजातीय ,आंतरजातीय सत्यशोधक विवाह जास्त व्हावेत म्हणून प्रयत्नशील राहावे असे देखील म्हंटले.या प्रसंगी सत्यशोधक केंद्राचे रमेश राक्षे,रोहिदास तोडकर,रघुनाथ ढोक,सचिन बगाडे, वामन वळवी,adv. शारदा वाडेकर,आकाश ढोक उपस्तीतीत होते.यावेळी अखिल भारतीय समता परिषद पुणे महानगर चे अध्यक्ष रघुनाथ ढोक यांनी वधु वर यांना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले प्रतिमा भेट दिली.यावेळी मुलाचे आई वडील व मोठया संख्येने सर्व समाज,विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.