कटंगी व सितेपार शाळेत गोवर रुबेलाचे लसीकरण

0
13

गोंदिया,दि.04ः- गोरेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा कटंगी (बु) येथे व आमगाव तालुक्यातील सितेपार येथील छत्रपती विद्यालयात राष्ट्रीय गोवर रुबेला लसीकरण मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेकरिता कटंगी (बु.) येथे डॉ. वेदप्रकाश पांडेय(आरोग्य सेवक), श्रीमती डी. पी. रहमतकर (ANM), श्रीमती आय. बी. टेमभुर्णीकर,पुस्तकला हरिणखेडे ,निरांजनी रहांगडाले(आशा सेविका) यांनी 229 विद्यार्थ्यांना लसीकरण केले.मोहीम यशस्वीतेसाठी आरोग्य विभागाच्या जिल्हा समन्वयक अर्चना वानखेडे, डॉ. मीना वट्टी, डॉ. एस. उपाध्याय,सपना खंडाईत, जिल्हा परिषद सदस्य ललीता चौरागडे,सरपंच तेजेंद्र हरिणखेडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डिलेश्वर ठाकरे,पालक, शाळेच्या मुख्याध्यापिका करंडे आणि शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षिका यांचे सहकार्य लाभले.

छत्रपती विद्यालयात लसीकरण

आमगाव तालुक्यातील छत्रपती विद्यालय सितेपार येथे गोवर रुबेला लसीकरण मोहीम आरोग्य विभागातर्फे राबविण्यात आली.यावेळी ग़ाम पंचायत सितेपारचे सरपंच गोपाल मेश्राम,माजी सरपंच सेवक चौधरी ,तं.मू.अध्यक्ष सुधीर ,बिसेन, सुरेन्द्र बिसेन उपाध्यक्ष शि.पा.संघ,श्रीमती क्षिरसागर,श्री.वासनीक(एम.आर) अंगणवाडी सेविका ,आशाताई, एम.एस.पटले मुख्याध्यापक शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत शाळेतील २६० विद्यार्थी पैकी एकूण २५४ विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.