मुख्य बातम्या:
लमाणतांडा येथे जय सेवालाल महाराज जयंती साजरी# #पटेल दाम्पत्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरात 240 रुग्णांची तपासणी# #24 पोलीस अधिकारी कर्माचार्यांचा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते पद्दोन्नतीपर सत्कार# #तामिळनाडू, दक्षिण एक्स्प्रेसवर आरपीएफची धाड# #पेंढरी तालुक्याची लोकचळवळीतून मागणी# #वरठीचे सरपंच, सचिवांवर कारवाईची टांगती तलवार# #रानडुकराची शिकार; तिघांना अटक# #वेळापूर अकलूज येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी# #डीपीओसह 4 अधिकार्यांवर कारवाई,जिल्हाधिकार्यांनी केले घरभाडे भत्ते बंद# #आम्ही सिंचनाच्या सोयी देऊ ; तुम्ही जोडधंद्यासाठी तयार व्हा : ना. हंसराज अहिर

युवकांच्या कलागुणांचा विकास हेच आमचे ध्येय – आ. रहांगडाले

तिरोडा,दि.05ः- भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय व ऑलम्पीक स्पर्धेत टिकावेत त्यासाठी तळागळातील खेळाडूंना संधी मिळावी यासाठी सीएम चषक घेण्यात येत आहे. यात तालुका, जिल्हा, विदर्भ व महाराष्ट्र स्तरावर स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यामध्ये युवकांच्या कला-गुणांचा विकास व्हावा हेच आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी केले.
तालुकास्तरीय सीएम चषकच्या उद््घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले होते. यावेळी माजी आ. भजनदास वैद्य, हरिष मोरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले, आशिष बारेवार, जिल्हा संघटनमंत्री विरेंद्र अंजनकर, विजय डिंकवार, उमाकांत हारोडे, डॉ. वसंत भगत, माजी जिप उपाध्यक्ष मदन पटले, भाऊराव कठाणे, चित्ररेखा चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष पटले यांनी भाजपाच्या काळात तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचा विकास झपाट्याने होत असून आ. रहांगडाले त्यासाठी सतत पाठपुरावा करीत असल्याचे सांगितले. यावेळी दोन गटात कबड्डीचा सामना घेण्यात आला. त्यात दोन्ही चमुंना प्रोत्साहनपर एक-एक हजार रुपयांचे पारितोषिक आ. रहांगडाले यांच्या हस्ते देण्यात आले. संचालन अनुप बोपचे यांनी केले. प्रास्ताविक पुष्पराज जनबंधू यांनी मांडले. आभार ओम कटरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी गौरी पारधी, शितल तिवडे, अनंता ठाकरे, बंटी श्रीबांसरी, निरज सोनेवाने आदी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

Share