मुख्यमंत्री पेयजल योजनेतून प्रत्येक गावात पाण्याची टाकी : विनोद अग्रवाल

0
5

गोंदिया,दि.05ः- तालुक्यातील पोवारीटोला येथे २५ – १५ योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ५ लाखांच्या सभामंडप आणि चावडी बांधकामाचे भूमिपूजन माजी जि . प. उपाध्यक्ष तसेच भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी निधी मंजूर करून दिल्याबद्दल विधानपरिषद आमदार परिणय फुके यांचे आभार मानले.अग्रवाल म्हणाले कि नेहमीच माझे महत्व कामाला राहिले आहे. इतरांप्रमाणे एका कामाचे १० वेळा भूमिपूजन करण्याचा आजार मला नाही. उत्तम दर्जाची काम करायची असल्यास अशा प्रकारच्या भूमिपूजन आणि उदघाटन सोहळा टाळायला हवा आणि साधेपणाने विधिवत भूमिपूजन करायला हवे असे प्रतिपादन यावेळी अग्रवाल यांनी केले.
२०१६ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूरु केलेल्या मुख्यमंत्री पेयजल योजनेवर त्यांनी भर दिला. राज्यातील ग्रामीण भागांतील दीर्घकालीन गरजांचा व आरोग्याचा विचार करुन ग्रामीण जनतेस पुरेसे व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याकरिता ‘मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम कार्यक्रम राबवत असल्याचे सांगितले. या अंतर्गत नवीन योजना हाती घेण्यात येणार असून, बंद असलेल्या योजनांचे पुनरुज्जीवन देखील करण्यात येणार आहे. सोबतच जलयुक्त शिवाराचे काम सुरु असून पाणी प्रश्न लवकरच सुटेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. यावेळी मुनेश रहांगडाले , दिनदयाल जी रहांगडाले, तारकेश्वर चौधरी (सरपंच ), बाबापाटील चौधरी (पोलीस पाटील), सेवकरामजी चौधरी, राम दयाळ रहांगडाले, खेतरामजी पुसाम , नेतरामजी पुसाम, विनोद शहारे , हिवेश्वरीबाई चौधरी, सुगवंताबाई शहारे , गीतेश्वरीबाई चौधरी , देवाचंदजी चौधरी, शालिकरामजी रहांगडाले , सोमेश्वर चौधरी, मुकेश रहांगडाले, जितेंद्र रहांगडाले , रामूजीं सय्याम , संजय शहारे , महानंद शहारे , रुपचंदजी चौधरी , ओ . टी . चौधरी, राजकुमार गौतम , सोमेश्वर पुसाम , संजय राऊत , मोतीलाल आंबेडारे , गुलाब रहांगडाले, नरेश रहांगडाले, व्यंकट रहांगडाले, महानंद शहारे आणि लेखराम दाणी तसेच अन्य गावकरी बांधव उपस्थित होते.