सौ .प्रेमजीत गंटीगंते राष्ट्रीय गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित

0
63

मुंबई,दि.05 : मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबईच्या वतीने  राष्टीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार अंधेरीचे श्रीनिवास बगरका कनिष्ठ महाविद्यालय अंधेरी (प)च्या सौ. प्रेमजीत सुनिल गंटीगंते यांना मिळाला. पुरस्काराचे स्वरुप सन्मानपत्र ,सन्मानचिन्ह,गौरवपदक आणि महावस्त्र प्रदान संस्थापक अध्यक्ष अॅड. कृष्णाजी जगदाळे ,प्रकाश सावंत वर्षा यांच्या हस्ते देण्यात आला. हा कार्यक्रम दादर माटुंगा येथील सांस्कृतिक सभागृहात मुंबई येथे पार पडला.प्रेमजीत गंटीगंते श्री निवास बगरका कनिष्ठ महाविद्यालय अंधेरी( प) येथे प्राध्यापिका आहेत. कॉलेजमध्ये इंग्रजी विषयचे अध्यापन करतात व इंग्रजी विषयाचे विविध उपक्रम राबविले आहेत. जादा तासिका घेतात, कॉलेज सभोवताली वृक्षलागवड केली आहे. स्वच्छता अभियान, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन , वृक्षारोपण व वृक्षसंगोपन .ताण तणाव व्यक्ती महत्त्व विकास मार्गदर्शन असे अनेक उपक्रम राबवून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील आहेत.त्यांचे मासिक,विशेषांक यामध्ये वृत्तांत लेख, अनेक इंग्रजी कविता प्रकाशित झाले आहेत व मुंबई स्टोरी मिररमध्ये लेखन करतात .अप्रगत विद्यार्थी तसेच गोरगरिब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात तसेच त्यांना सी.इ.डी.फांऊडेशन दिल्लीच्या पुरस्कारराने सन्मानीत केले आहे.यांच्या शैक्षणिक सामाजिक सांकृतिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे.कार्यक्रमाला एल गोगावले, अमोल सुपेकर,सुनिल गंटीगंते व राज्यातील गुणिजन शिक्षक उपस्थित होते.