मुख्य बातम्या:
कन्हैयाकुमार, प्रकाश राज रविवारी नागपुरात# #शुक्रवारपासून गडचिरोलीत कृषी व गोंडवन महोत्सव# #अकोल्यात जीर्ण इमारत कोसळल्याने एकाचा मृत्यू# #अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गुरुवारला# #नक्षल्यांनी पेरून ठेवलेले विस्फोटक पोलिसांनी केले जप्त# #"प्रविण कोचे उत्कृष्ठ पोलीस पाटील पुरस्काराने सम्मानीत"# #अवैध रेतीवाहतूकीवर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक# #परिवर्तन स्पेशल स्कूल (पीओ आरडीएसी)  सफदरजंग एन्क्लेव में बच्चों की स्पर्धा# #अपघाताला आळा घालण्यासाठी अतिक्रमणे हटविण्यासोबतच नियमांची अंमलबजावणी करा- लक्ष्मीनारायण मिश्रा# #रविवारी निरीक्षक प्रमाणित शाळा व तत्सम पदे परीक्षा

राज्यात नवीन वर्षात मेगाभरती

मुंबई,दि.05 – मराठा अारक्षणाच्या निर्णयानंतर राज्यातील मेगा नाेकरभरतीला अाता वेग अाला अाहे. पुढील दाेन वर्षांत तब्बल ७२ हजार पदे राज्य सरकार भरणार अाहे, त्यापैकी ३६ हजार पदे २०१९ या वर्षात भरण्यात येतील. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करणे व इतर प्रक्रिया डिसेंबरअखेरीस किंवा जानेवारी महिन्यात सुरू हाेईल अाणि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या अाठवड्यात उमेदवारांच्या लेखी परीक्षांचे नियाेजनही केले जाऊ शकते. या नवीन भरतीत पूर्वीच्या अारक्षणासाेबतच मराठा समाजालाही १६% अारक्षण असेल.

मेगा नाेकरभरती प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात सरकार ग्रामीण भागातील रिक्त पदे भरण्यासाठी प्राधान्य देणार अाहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने मंगळवारी मंत्रालयात बैठक घेऊन कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, वने या विभागांतील क्षेत्रीय स्तरावरील रिक्त पदांचा अाढावा घेतला. विशेष म्हणजे यापैकी अाराेग्य खाते वगळता उर्वरित सर्व खाती भाजपच्या मंत्र्यांकडेच अाहेत.

मराठा अारक्षणाचा निर्णय झाल्यानंतर नाेकर भरती प्रक्रियेला सरकारने गती दिली अाहे. मात्र अारक्षणालाच हायकाेर्टात अाव्हान देण्यात अाल्याने त्यावर काय निर्णय येताे त्यावर भरती प्रक्रियेचेही भवितव्य अवलंबून अाहे. मात्र काेर्टाच्या निर्णयापूर्वी नाेकरभरती झाल्यास राज्य सरकार त्या पदांना संरक्षण देऊ शकेल. २००४ मध्येही आघाडी सरकारने भरती केलेल्या पदांना संरक्षण अद्याप कायम आहे. मुख्यमंत्र्यांच्या अादेशानंतर मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांची समिती नाेकर भरतीसंदर्भात दरराेज अाढावा घेत अाहे. या प्रक्रियेतील पहिला टप्पा असलेल्या बिंदू नामावली तपासणीचे काम सध्या सुरू असून त्यानंतर रिक्त पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील, असे मुख्य सचिवांनी सांगितले. मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात ही प्रक्रिया सुरू हाेणार अाहे.

कोणत्या खात्यात किती जागा आहेत रिक्त 
१०,५६८ अाराेग्य खाते
७,१११ गृह खाते
११,००० ग्रामविकास खाते
२,५०० कृषी खाते
८,३३७ सार्वजनिक बांधकाम
१,५०० नगरविकास खाते
८,२२७ जलसंपदा खाते
२,४२३ जलसंधारण खाते
१,०४७ पशुसंवर्धन खाते
९० मत्स्य खात्यात

Share