प्रथम कंत्राटी कर्मचार्यांंना स्थायी करा मगच मेगा भरती घ्या – कंत्राटी कर्मचारी महासंघ

0
15
मुंबई. (विशेष प्रतिनिधी),दि.05 – राज्यात कंत्राटी कर्मचारी कार्यरत असून प्रथम कंत्राटी कर्मचारी यांना स्थायी करा मगच मेगा भरती घ्या असे महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
यावेळी मुलाणी म्हणाले की, संपूर्ण राज्यात 05 लाख कंत्राटी कर्मचारी आज मंत्रालय ते ग्रामपंचायत पर्यंत सर्व विभागात काम करत आहे. त्यात मंत्रालय आस्थापना, आयुक्तालय, संचालनालय, महामंडळे, स्थानिक स्वायत्त संस्था मध्ये अनेक अधिकारी व कर्मचारी कंत्राटी पद्धतीने चोख काम करत आहे. वर्षानुवर्षे त्यांना कामाचा अनुभव सुद्धा आला आहे. जर हेच कंत्राटी कर्मचारी परमनंट केले तर त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण द्यावे लागणार नाही त्यामुळे राज्य शासनाचा वेळ आणि पैसा वाचेल.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष मुकुंद जाधवर म्हणाले की, आमच्या वर आता अटीतटीची वेळ आली आहे आता आंदोलन केले तर सरकार काहीतरी गाजर देऊन आम्हाला शांत करेल पण निर्णय काय होणार नाही म्हणून जर कंत्राटी कर्मचारी यांना मेगा भरती च्या आधी परमनंट केले नाही तर आम्ही न्यायालयात याचिका दाखल करू ! अशा शब्दात जाधवर यांनी आपली प्रक्रिया व्यक्त केली आहे.