शिक्षकांनी अद्यापनाचे कार्य मागे पडू नये यास प्राधान्य द्यावे-प्राचार्य खुशाल कटरे

0
9
सडक अर्जुनी,दि.05ः–बदलत्या शैक्षणीक धोरणाच्या अनुषंगाने ,शिक्षण विभाग विद्यार्थ्यांचे अध्ययन निष्पती तथा अध्ययनस्तर निश्चितीसारखे अनेक उपक्रम राबविण्याचा आग्रह शिक्षकांकडे धरतो.याचा पाठपुरावा करण्यासाठी बहुतेक शाळांचे मुख्याध्यापकासह शिक्षक सांख्यकिय माहीती ऑनलाईन करण्यास प्रथम प्राधान्य देतात. परीणामी नियमीत अध्यापण व विद्यार्थ्यांचे अध्ययन मागे पडल्याचे अनुभवास येते.म्हणुण प्रत्येक शाळांनी नियोजन करून अतिरीक्त कार्य केल्यास सोईचे होईल.सर्वांनी अध्ययन-अध्यापण प्रक्रिया प्रभावित होऊ देऊ नये असे विचार प्राचार्य खुशाल कटरे यांनी व्यक्त केले.ते  तालुक्यातील आदिवासी विकास हायस्कुल व कला,विज्ञान उच्च माध्यमिक शाळा खजरी/डोंगरगाव येथे शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केंद्रस्तरीय शिक्षण परीषद तथा अध्ययन स्तर निश्चिती मंथन सभेच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.याप्रसंगी सडकअर्जुनी तालुका मुख्याध्यापक संघाचे कार्यवाह दिलीप चाटोरे,शिक्षण विस्तार अधिकारी श्री बागडे,केंद्र प्रमुख डी.आय.कटरे,डीआयईसीपीडीचे साधन व्यक्ती सुनील राऊत ,तज्ञ मार्गदर्शक श्री वैद्द ,व ईतर मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.श्री कटरे पुढे म्हणाले विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती व अध्यन स्तर निश्चिती वस्तुस्थिती गृहीत धरून करावी .त्याच्याशिवाय संम्बधित विद्यार्थ्याला घडविण्या साठी सार्थक उपाय योजना करता येणार नाही.शाळेत संघटना भेदामुळे शाळा बाहेरील घटकांची लुडबुड वाढते ,परीणामी शाळेत आयोजीत उपक्रम प्रभावीत होतात.या मंथन सभेत डव्वा व पांढरी केंद्रातील सर्वच व्यवस्थापणाचे ई.1ते 8चे शिक्षक सहभागी झाले होते.