ओबीसीत समाविष्ठ करा लोधी समाज बांधवांचा एल्गार

0
13

गोंदिया,दि.05ः- गेल्या अनेक वर्षापासून केंद्रामध्ये लोधी समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ठ करण्यात यावे या मागणीला घेऊन लढा देत असलेल्या लोधी समाजाने आज बुधवारला गोंदिया शहरात मोटार सायकल रॅली काढून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.महाराष्ट्रात ओबीसीप्रवर्गात मोडत असलेल्या लोधी समाजाला केंदाच्या यादीतही ओबीसीमध्ये समाविष्ठ करण्याच्या मुख्य मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फेत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. केंद्राच्या यादीत ओबीसीत मोडत नसल्याने महाराष्टातील सुमारे 48 लाख लोधी समाज बांधवांना लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. यासाठी मराठा आरक्षणाच्या सरकारी घोषणेनंतर लोधी समाजाने पहिल्या टप्यात हे आंदोलन आज केले.यावेळी रुपचंद ठकरे,लक्ष्मण नागपूरे,राजीव ठकरेेले, अर्जुन नागपूरे,गु्ड्डू लिल्हारे,छाया दसरे,उमेश भांबरे,संजय नागपूरे,महेंद्र बघेले,टिटूलाल लिल्हारे,उमाप्रसाद उपवंशी,दयाराम तिवाडे,बाबा अटराये प्रामुख्याने उपस्थित होते.मोटारसायकल रॅलीत जिल्ह्यातील हजारोच्या संख्येत समाजबांधव सहभागी झाले होते.देशातील 18 राज्यात लोधी समाज निवास करीत असून 14 राज्यात लोधी समाजाला केंद्राच्या ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले आहे.तर 2 राज्यात लोधी समाज एस.टी.प्रवर्गात आहे. मात्र महाराष्ट व झारखंड या दोन राज्यातील लोधी समाजाला अद्यापही केंद्राच्या इतर मागास प्रवर्गात समाविष्ठ करण्यात आलेले नाही.लोकसभा निवडणुकीपुर्वी सरकारने निर्णय न घेतल्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.