मुख्य बातम्या:
लमाणतांडा येथे जय सेवालाल महाराज जयंती साजरी# #पटेल दाम्पत्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरात 240 रुग्णांची तपासणी# #24 पोलीस अधिकारी कर्माचार्यांचा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते पद्दोन्नतीपर सत्कार# #तामिळनाडू, दक्षिण एक्स्प्रेसवर आरपीएफची धाड# #पेंढरी तालुक्याची लोकचळवळीतून मागणी# #वरठीचे सरपंच, सचिवांवर कारवाईची टांगती तलवार# #रानडुकराची शिकार; तिघांना अटक# #वेळापूर अकलूज येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी# #डीपीओसह 4 अधिकार्यांवर कारवाई,जिल्हाधिकार्यांनी केले घरभाडे भत्ते बंद# #आम्ही सिंचनाच्या सोयी देऊ ; तुम्ही जोडधंद्यासाठी तयार व्हा : ना. हंसराज अहिर

अस्वलाचा विहिरीत पडून मृत्यू

पवनी,दि.06ः-उमरेड-पवनी-कर्‍हांडला अभयारण्यालगत असलेल्या कोटलपार गावशिवारातील विहिरीत पडून एका अस्वलाचा मृत्यू झाला. ही घटना आज, बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास उघडकीस आली.
कोटलपार हे गाव प्रादेशिक वन विभागात येत असून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर उमरेड-पवनी-कर्‍हांडला अभयारण्य लागतो. या अभयारण्यातील राणाई बिटातून हे अस्वल कोटलपार गावाच्या दिशेने आले असावे असा अंदाज आहे. गावातील सत्यभामा भागवत यांच्या शेतातील विहिरीत हे अस्वल पडले. शेतातील विहिर ही जमिनीला समांतर असून विना कठड्यांची आहे. ही घटना दोन दिवसांपुर्वीच्या रात्रीला घडली असावी. विहिरीत भरपूर पाणी असून लोखंडी कळ्या नसल्यामुळे अस्वलाला बाहेर पडता आले नसल्याने त्याचा मृत्यू झाला.
आज शेतशिवाराजवळ दुर्गंधी येत असल्यामुळे गावातील काहींनी विहिरीजवळ जाऊन बघितले तेव्हा ही घटना उघडकीस आली. गावकर्‍यांनी ही माहिती वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी शेंडे यांना दिली. वन विभागाचे पथक व मैत्र संस्थेचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अस्वलाला विहिरीतून बाहेर काढून वाही डेपो येथे आणले.

Share