मुख्य बातम्या:
राष्ट्रवादी काँग्रेसने खड्यात बेशमरची झाडे लावून केले आंदोलन# #आ.अग्रवालांनी कर्जमाफीच्या ऐतिहासिक निर्णयाचे केले कौतुक# #कन्हैयाकुमार, प्रकाश राज रविवारी नागपुरात# #शुक्रवारपासून गडचिरोलीत कृषी व गोंडवन महोत्सव# #अकोल्यात जीर्ण इमारत कोसळल्याने एकाचा मृत्यू# #अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गुरुवारला# #नक्षल्यांनी पेरून ठेवलेले विस्फोटक पोलिसांनी केले जप्त# #"प्रविण कोचे उत्कृष्ठ पोलीस पाटील पुरस्काराने सम्मानीत"# #अवैध रेतीवाहतूकीवर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक# #परिवर्तन स्पेशल स्कूल (पीओ आरडीएसी)  सफदरजंग एन्क्लेव में बच्चों की स्पर्धा

शिक्षक पतसंस्थेची रक्कम गुंतविली म्युच्युअल फंडात

भंडारा,दि.06ः-भंडारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेतील चार कोटी एक लक्ष रुपये नियमबाह्यरित्या म्युच्युअल फंडात गुंतविण्यात आली. या गैरप्रकाराची आपण जिल्हा उपनिबंधकांकडे तक्र ार केली असल्याचे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकार्‍यांनी पत्रपरिषदेत सांगितले. येथील विर्शामगृहात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेला अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्‍वर दमाहे, जिल्हा उपाध्यक्ष केशव बुरडे आदी उपस्थित होते.
यावेळी शिक्षक संघाचे पदाधिकारी म्हणाले, जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष संजीव बावणकर यांनी संचालक मंडळाला विश्‍वासात न घेता नियमबाह्यरित्या संस्थेचे ४ कोटी १ लक्ष रुपये म्युच्युअल फंडात गुंतविले. या संदर्भात बहुमताने संचालकांनी नामंजूरी दिली होती. तरी संस्थेच्या अध्यक्षानी स्वत:चे आर्थिक हितसंबंध साधण्यासाठी गुंतवणूक केली आहे. सभासदांना वेळेवर सुलभ कर्ज पुरवठा करणारी संस्थेची स्थिती ही नागपूरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसारखी होणार काय? अशी भीतीही यावेळी व्यक्त करण्यात आली.
संस्थेच्या कर्जर्मयादा व ठेवीवरील व्याज दराबाबत बोलताना ज्ञानेश्‍वर दमाहे व रमेश सिंगनजुडे म्हणाले की, १ डिसेंबर २0१८ पासून कर्जर्मयादा १२ लक्ष रुपये करुन कर्जावरील व्याजदर १ टक्के कमी केले आहे. परंतु, संस्थेच्या अध्यक्षांनी जाणीवपुर्वक दुसरी बाजू सभासदांसमोर येवूच दिली नाही. ती म्हणजे, सभासदांच्या सर्वच प्रकारच्या ठेवीवर १ टक्के व्याज दर कमी करण्यात आला आहे. सभासदांच्या निस्वार्थ हितासाठी संस्था २ टक्क्यांच्या फरकावर चालत होती. परंतु सध्या संस्था ३ टक्क्यांच्या फरकावर व्यवहार करीत असल्यामुळे सभासदांवर अन्याय होत आहे. संस्थेची विद्यमान सभासद संख्या २६00 असून कर्मचारी ३१ आहे. आकृतीबंधानुसार ३५ कर्मचार्‍यांचा आकृतीबंध मंजूर होता. मात्र त्यावेळी संस्था संगणीकृत नव्हती. संस्थेने ४0 लक्ष रुपयांपेक्षा जास्त खर्च करुन संस्था संगणीकृत केली आहे. त्यावरही २७ नोव्हेंबर २0१८ ला संचालक मंडळाच्या सभेत कर्मचारी भरती करण्याचा ठराव घेण्यात आला आहे. कर्मचारी संख्या कमी होण्यापेक्षा विद्यमान अध्यक्षांनी कर्मचारी भरती करण्याचा घाट रचला आहे. यात अध्यक्षांच्या हेकेखोरपणा दिसून येत असून सभासदांचे हित संस्था जोपासणार कसे, असा प्रश्नही पत्रपरिषदेत उपस्थित करण्यात आला. पत्रकार परिषदेला अशोक ठाकरे, विजय चाचेरे, कैलाश चव्हाण, जे. एम. पटोले यासह संघाचे अन्य पदाधिकारी व सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Share