मुख्य बातम्या:
लमाणतांडा येथे जय सेवालाल महाराज जयंती साजरी# #पटेल दाम्पत्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरात 240 रुग्णांची तपासणी# #24 पोलीस अधिकारी कर्माचार्यांचा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते पद्दोन्नतीपर सत्कार# #तामिळनाडू, दक्षिण एक्स्प्रेसवर आरपीएफची धाड# #पेंढरी तालुक्याची लोकचळवळीतून मागणी# #वरठीचे सरपंच, सचिवांवर कारवाईची टांगती तलवार# #रानडुकराची शिकार; तिघांना अटक# #वेळापूर अकलूज येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी# #डीपीओसह 4 अधिकार्यांवर कारवाई,जिल्हाधिकार्यांनी केले घरभाडे भत्ते बंद# #आम्ही सिंचनाच्या सोयी देऊ ; तुम्ही जोडधंद्यासाठी तयार व्हा : ना. हंसराज अहिर

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात

गोंदिया,दि.06ः-जागतिक दिव्यांग दिनानिमीत्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथून दिव्यांगांची रॅली काढण्यात आली. रॅलीचे उद््घाटन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. या रॅलीत दिव्यांग विद्यार्थी, दिव्यांग व्यक्ती, सर्व शिक्षा अभियान प्रवेशित विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी झाले होते. यावेळी जि. प. समाज कल्याण समिती सभापती विश्‍वजीत डोंगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस. ई. ए. हाश्मी, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शुभांगी आंधळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील शासनमान्य दिव्यांगांच्या शाळा/कर्मशाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा पोलीस मुख्यालय ग्राउंड कारंजा येथे घेण्यात आल्या. या स्पर्धेत जवळपास २५0 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जिल्हास्तरीय क्रीडा स्पधेर्चे उद््घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सीमा मडावी यांनी केले. अध्यक्षस्थानी जि.प.समाज कल्याण समिती सभापती विश्‍वजीत डोंगरे होते. कार्यक्रमाला जि.प.कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवाने, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.ई.ए.हाश्मी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके यांचेसह मुख्याध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिव्यांग विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमास जि.प.समाज कल्याण समिती सभापती विश्‍वजीत डोंगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.ई.ए.हाश्मी, उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य देवसुदन धारगावे व जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षीस वितरण करण्यात आले.

Share