गोरेगाव तालुका विज्ञान प्रदर्शनी उत्साहात,52 स्पर्धक सहभागी

0
14

गोरेगाव,दि.06ः- गोरेगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन 4 व 5 डिसेंबरला गट साधन केंद्र पं. स. गोरेगावच्या वतीने येथील पी. डी. रहांगडाले विद्यालयात घेण्यात आले.या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन समाजकल्याण सभापती  विश्वजित डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभापती माधुरीताई टेंभरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गोरेगावचे नगराध्यक्ष इंजि. आशिष बारेवार, जि. प. सदस्या सौ.ज्योतीताई वालदे, गटसमन्वयक एस. बी. खोब्रागडे,आर. एल. मांढरे(व. शि.वि.अ.),टी.बी. भेंडारकर (व.शि.वि.अ.),पी.डी.रहागंडाले विद्यालयाचे प्राचार्य एच. डी.कावळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.सर्व प्रथम गट साधन केंद्र गोरेगाव येथील शिक्षक गोविंदराव गणेश ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलतांना समाजकल्याण सभापती विश्वजीत डोंगरे यांनी संशोधनातून बाल वैज्ञानिक तयार होत असून अशा विज्ञान प्रदर्शनाचा लाभ तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असा संदेश दिला.तर पंचायत समिती सभापती  माधुरीताई टेंभरे यांनी आजच्या युगात विज्ञानाची गरज महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले.नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी बालवैज्ञानिकांतुन मिसाईल मॅन तयार व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. याशिवाय प्रमुख पाहुण्यांनी समयोचित मार्गदर्शन केले. संचालन शिक्षक ए. एच. कटरे यांनी तर प्रास्ताविक गटसाधन केंद्राचे विषयतज्ञ बी. बी. बहेकार यांनी केले.आभार गटसमन्वयक एस. बी. खोब्रागडे यांनी मानले.
यावेळी आयोजित प्रदर्शनातर 52 माँडेल्स ( वैज्ञानिक प्रतिकृती) विविध शाळांतील विद्यार्थी, शिक्षक, प्रयोगशाळा सहायक यांचेद्वारे सादर करण्यात आले. प्रतिकृतींचे परीक्षण जगत विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापकांनी केले. त्यानुसार प्राथमिक विद्यार्थी गटातून कु. वैदेही प्रकाश कनोजे (जि. प. शाळा कमरगाव), कु. उपेक्षा राजू सानेशर(महर्षी वि.मं.तुमखेडा), कु. वैष्णवी मुनेश्वर बिसेन(जि.प. शाळा बाम्हणी) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला.माध्यमिक विद्यार्थी गटातून कु. शिल्पा लेकचंद पटले ( पी. डी.रहांगडाले विद्या. गोरेगाव), कु. नेहा हंसराज खोब्रागडे (उमादेवी हाय. घुमर्रा), कु. जागृती केदारनाथ बिसेन (रविंद्र विद्या. चोपा) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला. प्राथमिक शिक्षक गटातून डी. व्ही. टेटे(जि. प. शाळा बाम्हणी), माध्यमिक शिक्षक गटातून ए.एच.कटरे(पी.डी.रहांगडाले विद्या. गोरेगाव) आणि प्रयोगशाळा सहायक गटातून पी.एम. दमाहे (सरस्वती वि.मं.घोटी) हे विजेते ठरले.
विज्ञान प्रदर्शनाचा समारोप गटशिक्षणाधिकारी एम. बी.लांडे यांच्या अध्यक्षतेखाली 5 डिसेंबरला पार पडला.जगत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.वाय.लंजे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.विज्ञान प्रदर्शनीच्या यशस्वितेसाठी गट साधन केंद्रातील विषयतज्ञ सर्वश्री एस.बी.ठाकुर, एस.टी.बावनकर, ओ.एस. ठाकरे व कु. एस.डी. रहांगडाले तसेच पी. डी. रहांगडाले विद्या. गोरेगाव येथील सर्व शिक्षकवर्ग व कर्मचारीवृंद यांनी परिश्रम घेतले.