मुख्य बातम्या:
राष्ट्रवादी काँग्रेसने खड्यात बेशमरची झाडे लावून केले आंदोलन# #आ.अग्रवालांनी कर्जमाफीच्या ऐतिहासिक निर्णयाचे केले कौतुक# #कन्हैयाकुमार, प्रकाश राज रविवारी नागपुरात# #शुक्रवारपासून गडचिरोलीत कृषी व गोंडवन महोत्सव# #अकोल्यात जीर्ण इमारत कोसळल्याने एकाचा मृत्यू# #अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गुरुवारला# #नक्षल्यांनी पेरून ठेवलेले विस्फोटक पोलिसांनी केले जप्त# #"प्रविण कोचे उत्कृष्ठ पोलीस पाटील पुरस्काराने सम्मानीत"# #अवैध रेतीवाहतूकीवर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक# #परिवर्तन स्पेशल स्कूल (पीओ आरडीएसी)  सफदरजंग एन्क्लेव में बच्चों की स्पर्धा

आज स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला ‘शोध क्षमतेचा,ग्रामीण ऊर्जेचा‘

गोंदिया : केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत नोकर भरतीच्या अनुषंगाने जाहिराती प्रकाशित करण्यात येतात. गोंदिया जिल्हा हा नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल भागात मोडत असल्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विविध विभागाच्या नोकर भरतीच्या जाहिरातीबाबत विस्तृत माहिती नसते. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती व्हावी तसेच विविध विभागाच्या/पदांच्या अनुषंगाने परीक्षेची तयारी कशी करावी, त्याकरीता आवश्यक बाबी इत्यादी विषयी तज्ज्ञ वक्त्यांमार्फत मार्गदर्शन करणे व विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरीता जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्या वतीने नाविण्यपूर्ण उपक्रम ‘शोध क्षमतेचा,ग्रामीण ऊर्जेचाङ्क ही स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला सुरु करण्यात आलेली आहे.
या व्याख्यानमालेअंतर्गत प्रत्येक महिन्यात दर शुक्रवारला तज्ज्ञ वक्ते/अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन करण्यात येते. त्यानुसार पुढील सत्राचे आयोजन ७ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गोंदिया येथे करण्यात आले आहे. सदर व्याख्यानमालेकरीता आमगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी मनुज जिंदाल, गोंदिया वनपरिक्षेत्र अधिकारी राज नानवटे व वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती स्नेहल म्हसकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तरी गोंदिया जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या/इच्छुक असलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या व्याख्यानमालेचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांनी केले आहे.

Share