मुख्य बातम्या:
वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य नियोजन करा-विभागीय आयुक्त पीयूष सिंह# #मेंढे यांच्या मूळगावासह मतदारसंघात कार्यकर्त्यांनी साजरी केली दिवाळी# #अंकुश शिंदे सोलापूरचे नवीन पोलीस आयुक्त, तर एम. बी. तांबडें नवे नक्षलचे पोलीस उपमहानिरिक्षक# #जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जूनला मतदान# #कवयित्री पंचवटी गोंडाळे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान# #वंचित बहुजन आघाडीमुळे दोन माजी मुख्यमंत्र्याना पराभवाचा फटका# #५0 हजारांची लाच स्वीकारणार्‍या मंडळ अधिकार्‍याला अटक# #निशुल्क एकदिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रम# #भारतीय सैन्यात महिला सैनिक पोलीस भरती# #खासदार भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान

महामानवाला अभिवादन करण्यासाठी लोटला जनसागर

गोंदिया/मुंबई,दि.06- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी आज (दि.06) चैत्यभूमीवर जावून राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावड़े, केंद्रिय मंत्री नितिन गडकरी, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यानी अभिवादन केले. राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनुयायांनी आज चैत्यभूमीवर अलोट गर्दी केली होती.बाबासाहेबांचे अनुयायी राज्यभरातून गेल्या तीन दिवसांपासून चैत्यभूमिवर गर्दी करत होते. दादर रेल्वे स्थानकापासून चैत्यभूमीपर्यंतचे सर्वच रस्ते अनुयायांनी भरले आहेत. महापरिनिर्वाणदिनानिमीत्त येणाऱ्या अनुयायांसाठी अनेक सामाजिक संस्था, संघटनांकडून मोफत भोजनदानाची व्यवस्था चैत्यभूमीवर करण्यात आली आहे.तसेच, मुंबई महापालिका आणि बेस्ट उपक्रमाने उत्तमरित्या सोयी करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक प्रकारच्या आवश्यक सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. वाहतुकीसोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच यावेळी दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी दादर रेल्वे स्थानकाजवळ भीमआर्मी संघटनेने निदर्शने केली आहेत.

नागपूर-पूर्व नागपुर कांग्रेस कमेटी व बाबासाहेब आम्बेडकर युवा संघर्ष समितीच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमीत्त वर्धमान नगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवानद करण्यात आले.यावेळी युवा नेता अभिजित गो वंजारी, ब्लाक अध्यक्ष राजेश पाैनीकर,विलास मेश्राम, बब्लू राऊत, नौशाद अंसारी,महेश वैरगड़े, शेषराव ज़ूमडे, मनोहर जुमानी,राजेश डेंगे,पुरुषोत्तम लोनारे,योगेश कुंजालकर,संजय मेंधे,हर्षल गजभिये,शरीफ़ दीवान,यशवंत चन्ने,राधेशाम खरे,शैलेश काबंळे, मयूर यादव व कार्यकर्ता उपस्थित होते.

गोंदिया-जिल्हा परिषद कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद अध्यक्षासंह सर्वच विभागप्रमुखांनी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.गोरेगाव येथील किरसान मिशन इंटरनॅशनल स्कुलमध्ये संस्थेचे प्रमुख नामदेवराव किरसान यांच्या प्रमुख उपस्थितीत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या जिवनचरित्राची माहिती देत अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे मिनीचैत्यभूमी असलेल्या गोंदियातील पांगोली नदीकाठावर जिल्ह्यासह शहरातील अनुयायांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून अभिवादन केले.सकाळपासून या मार्गावर गर्दी असल्याने त्या मार्गावरील शाळांना आज सुट्टी दिलेली होती. गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह गोंदिया येथील भीमघट येथे महापरिनिर्वाण दिनानिम्मित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.त्यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.युवा स्वाभीमान संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष जितेश राणे,जिवनलाल शरणागत,राकेश टेंभरे आदि उपस्थित होते. भारतीय कम्युनिस्ट पार्टी कार्यालयात वरिष्ठ कार्यकर्ता का.सि.के. ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत डा.बाबासाहेब आंबेडकर के प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी काॅ.मिलिंद गणविर,रामचंद्र पाटील,करूणा गनविर,सुरेश रंगारी,क्रांती गनविर,प्रकाश चौरे, जावेद जिलानी,सुखदेव वट्टी आदि उपस्थित होते. देवरी- कोरोटॆ भवन देवरी यॆथॆ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य सहषराम कोरोटॆ यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी नगरपंचायत उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटॆके,बळीराम कोटवार,कुलदिप गुप्ता,अमित तरजुले,नरेश राऊत यांच्या उपस्थितीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.

Share