परवानगी बिरसीची शाळा भरते दासगावला

0
13

गोंदिया,दि.०६ः-गोंदिया पंचायत समितीतंर्गत इयत्ता १ ते ४ वर्ग असलेल्या कान्व्हेटंला परवानगी बिरसी येथील असताना संचालकाने मात्र तालुक्यातील दासगाव येथे शाळा सुरु केल्याचे प्रकरण समोर आले आहे.गोंदिया पंचायत समितीच्या मासिक बैठकित सदर मुद्दा पंचायत समिती सदस्य अखिलेश सेठ यांनी उपस्थित करुन प्रशासनाला धारेवर धरले.तेव्हा कुठे गटशिक्षणाधिकारी यांनी अंकुर ज्ञान शिक्षण संस्थेच्या संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.विशेष म्हणजे आरटीई अंतर्गत कान्व्हेंट सुरु करण्याकरीता शिक्षण विभागाची परवानगी घेण्याची गरज नसते.पंरंतु इय्यता १ ते ४ करीता परवानगी घ्यावी लागते.त्यानुसार सदर संस्थाचालकाने बिरसी येथे शाळा सुरु करण्याची परवानगी घेतली.मात्र ती शाळा बिरसी येथे न चालविता दासगाव येथे चालविण्यास सुरवात केली.याविषयाची माहिती मिळताच सतत तीन मासिक सभेत पंचायत समिती सदस्य याविषयावर लक्ष वेधून कारवाईची मागणी करीत होते.त्यानंतर कुठे केंद्रप्रमुखामार्फेत चौकशी करण्यात आली असता स्वंय अर्थसहाय्यता योजनेतंर्गत ज्ञान अंकुर शिक्षण संस्थेच्यावतीने प्रेसींडेसी पब्लीक स्कुलला बिरसी पो.दासगाव ता.गोंदिया नावे मान्यता असल्याचे समोर आले.परंतु ती शाळा बिरसी येथे सुरु न करता दासगाव येथे चालविण्यात येत असल्याचे समोर आल्याने २८ नोव्हेंबरला शिक्षण संस्थाचालकाला शिक्षण विभागाच्यावतीने नोटीस बजावण्यात आली असून संस्थाचालकाकडून आलेल्या उत्तरानंतर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी यांनी दिली आहे.