5 जानेवारीला जिल्हा मुख्याध्यापकांचे अधिवेशन टेमणीत

0
12

गोंदिया,दि.07ः-गोंदिया जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांची सभा(दि.5)फुलचूर स्थित फुंडे कनिष्ठ महाविद्यायात पार पडली.या सभेत जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांचे 18 वे जिल्हा शैक्षणिक अधिवेशन 5 जानेवारी शनिवारला तालुक्यातील टेमणी येथील शोभादेवी हायस्कुल येथे आयोजीत करण्याचे सर्वसमंत्तीने ठरविण्यात आले.
सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष रमेश तणवाणी होते.याप्रसंगी रामसागर धावडे,महेंद्र मेश्राम,कु.रजिया बेग,दिनेश रहांगडाले,खुशाल कटरे ,दुर्गाप्रसाद पटले, बी.पी.बिसेन, डी.बी.गेडाम, बी.के.कोरे,सी.जी.पाऊलझगडे,कु.एस.डी.बघेले,श्रीमती अजया चुटे,एन.जी.भरणे,दिलीप चाटोरे,बी.पी.त्रिपाठी,जे.बी.कटरे,ओमप्रकाश पवार,प्रमोद चौरागडे, आर.एस.गायधने, विनोद गिर्हेपुंजे,संजय बघेले,एम.जी.हरीणखेडे,डी.एस.बाहेकर,एस.जी.मांढरे,डी.यु. ठाकुर, एन.के शेंडे,पी.एन.नागदेवे,एच.डी.भेंडारकर,पी.डी.गणविर,श्रीमती बी.आर.भारद्वाज आदी मुख्याध्यापक उपस्थित होते.प्रास्ताविक,संचालन व आभार संघ कार्यवाह बी.डब्लु.कटरे यांनी केले.संस्थाचालक गंजेन्द्र फुंडे यांनी सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्याध्यापक संघाच्यावतीने आभार मानण्यात आले.