ठाणा येथे सेंद्रीय शेती कृषी प्रदर्शनाचे उदघाटन

0
42

आमगाव,दि.07ः- गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात येणार्या तालुक्यातील ठाणा येथे डॉ. किरसान मिशन लोकसभा जनसंपर्क अभियान अंतर्गत गावपरिसरातील शेतकर्यांनी संघटीत होऊन निर्माण केलेल्या आमगांव फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्यावतीने आयोजित सेंद्रीय शेतीवर आधारित कृषी प्रदर्शनीचे उदघाटन डॉ. एन. डी. किरसान यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला नटवरलाल गांधी, अजय माहेश्वरी, डॉ. देशमुख, सरपंच अनिता आग्रे, संजय ब्राम्हणकर, सुषमाताई शिवनकर, प्रमोद वंजारी, प्राचार्य फुलझेले,कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.उदघाटनप्रसंगी डाॅ.किरसांन यांनी शेतकरी बांधवानी बदलत्या काळानुसार संघटित होण्याची गरज असून संयुक्त शेतीकडे वळत शेतातील उत्पादनाला भाव मिळावा याकरीता शेतीला व्यवसायाच्या दृष्टीकोनातून बघण्यास सुरवात करावी असे आवाहन केले.सोबतच रासायनिक खतामुळे शेतातील मातीची पोत कमी झाल्याने आणि धान्यासह पिकामध्ये रासयानिक खताचा प्रभाव वाढल्याने सेंद्रीय शेतकीकडे वळण्याची गरज असल्याचे विचार मांडले.यावेळी प्रदर्शनात शेतकर्यांनी आपल्या शेतात पिकविलेल्या उत्पादनाचे स्टाॅल लावले होते.त्या स्टाॅलचे निरिक्षणही पाहुण्यांनी केले.