मोफत चारा छावणी उभारणार ,सेवाभावी लोकांनी सहकार्य करावे- तुकाराम महाराज

0
18

जत(जमादार),दि.08ः- येथील गोंधलेवाडी संत बागडेबाबा यांचे शिष्य तुकाराम महाराज यांच्या कडून दुष्काळ निवारणासाठी 158 दिवस त्या परिसरातील नागरिकांसोबत राहून संघर्ष करण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे.जत तालुक्यातील नागरिकांना यावर्षी दुष्काळाशी सामना करण्याची वेळ आली आहे.सरकारने तालुक्यात गंभीर स्वरूपात दुष्काळ जाहीर केला.परंतु अजून तशा सुविधा उपलब्ध केल्या नाहीत या पार्श्वभूमीवर जत पूर्व भागातील टंचाई ग्रस्त गावांना पाण्याचे मोफत टँकर आणि जनावरांसाठी चारा छावणी सुरू करणार असल्याची माहिती संत बागडेबाबा यांचे शिष्य तुकाराम महाराज यांनी दिली.
तुकाराम महाराज म्हणाले की जत तालुक्यात निसर्ग सातत्याने कोपतो आहे दर एक दोन वर्षांनी दुष्काळाचे महाभयंकर सावट तालुक्यावर ओढावत आहे.यंदाही भीषणता तर खूप तीव्र स्वरूपाची आहे पावसाळ्यात अवघा सात इंच पाऊस झाला आहे. तर तालुक्यातले रब्बी व खरीप दोन्ही हंगाम वाया गेले आहेत. अशा स्टितित लोक पाण्यासाठी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी टाहो फोडत आहेत.

अशा स्तितीत आता आपणच आपल्या मातीतल्या माणसांना आधार देण्याची गरज आहे यासाठी आम्ही दुष्काळ संघर्षाचा हा लढा हाती घेतला आहे.१५८ दिवस दुष्काळग्रस्त सोबत काम करण्याचा संकल्प केला आहे.गोंधलेवाडी येथील बागडेबाबा च्या मठाच्या परिसरात सुमारे पाच हजार जनावरे वास्तव करतील असे नियोजन केले जाणार आहे. महाराजांनी सामाजिक बधीलकीला प्राधान्य दिले आहे.आजवर त्यांनी पाण्याच्या टाक्या वाटप करणे घरे बांधून देणे, स्वच्छ मिशनचा एक भाग म्हणून शौचालये उभारणे, गणेश मंडळांना मूर्ती वाटप करणे ,अपंग लोकांना आधार देणे अशी अनेक सामाजिक कामे त्यांनी सातत्याने साकारली आहेत.दरम्यान यंदाच्या दुष्काळात तर त्याने मुक्या जनावरांना जगण्याचे मोठे शिवधनुष्य उचलले आहे अनेक लोकांनी त्यांच्या संकल्पनेला साथ देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे जनावरांची छावणी आणि पाण्याचे टँकर तातडीने सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे, यावेळी दत्ता साबळे उपस्थित होते.