भंडाऱ्यात जनसंघर्ष यात्रेचे आगमन १७ रोजी

0
14

भंडारा,दि.08 : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात जनसंघर्ष यात्रा राबविण्यात येत आहे. जनतेचा संघर्ष व्यक्त होण्याच्या दृष्टिकोनातून जनसंघर्ष यात्रा भंडारा जिल्ह्यात १७ डिसेंबरला येत आहे. भंडारा येथे राजीव गांधी चौक येथे श्रीगणेश हायस्कूलच्या पटांगणावर सकाळी १० वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण व अनेक नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत..

या कार्यक्रमाच्या पूर्वनियोजन व पूर्वतयारी करण्याकरिता ५ डिसेंबरला माजी राज्यमंत्री बंडू सावरबांधे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत १७ डिसेंबरला भंडाऱ्यात होणाऱ्या जनसंघर्ष यात्रेच्या संबंधात चर्चा करण्यात आली. प्रस्तावना काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी मांडली. प्रफुल्ल गुडधे पाटील व निरीक्षक मुजीबभाई पठाण यांनी कार्यक्रमासंबंधी माहिती दिली. सर्व तालुका अध्यक्षांनी आपापली मते मांडली. संचालन अजय गडकरी यांनी केले. या प्रसंगी जि.प. अध्यक्ष रमेश डोंगरे, प्रमिलाताई कुटे, प्रमोद तितिरमारे, सीमाताई भुरे, प्रेम वनवे, रेखा वासनिक, प्रकाश पचारे, भाग्यश्री गिलोरकर, विकास राऊत,डॉ.अजय तुमसरे,अनिक जमा पटेल, प्रशांत देशकर, भरत खंडाईत, प्यारेलाल वाघमारे, शुद्ध्मता नंदागवली, रमेश पारधी, के.के. पंचबुधे, मनोहर राऊत, प्रदीप बुराडे, प्रणाली ठाकरे, नीलकंठ टेकाम, शमीम शेख, राजकपूर राऊत, सुनील गिऱ्हेपुंजे, प्रभू मोहतुरे, शंकर राऊत, अमर रगडे,मनोहर उरकुडकर, शंकर तेलमासरे, हरिराम निमकर, माणिकराव ब्राम्हणकर, सुनील गिऱ्हेपुंजे, मुकुंद साखरकर, सय्यद खान, नरेश करंजेकर, भैया मते, भाऊराव गजघाटे, लालूप्रसाद गोंडाणे, मंगेश हुमणे, नाहीद परवेज खान,चंद्रशेखर गजघाटे, रजनी मुळे, टी. दि. मारबते, भावना शेंडे, प्रकाश भोगे, राजेश हटवार, विकास भुरे, लता प्रधान आदी उपस्थित होते..