तीन-चार दशकानंतर गोंदियात पुन्हा फुटबॉल फिव्हरला उजाळा

0
40

भुवनेश,शोयब व उमेरच्या खेळाने गोंदियाचा फुटबॉल जिवंत
५० ते ७५ पैशाच्या तिकीटीवर प्रेक्षक त्यावेळी बघायचे सामने
खेमेंद्र कटरे,गोंदिया,दि.०९-स्वातंत्र्यापुर्वीपासून गोंदिया शहराला फुटबॉल खेळाचे वेड असले तरी स्वातंत्र्यानंतर १९७०च्या दशकापासून गोंदियाचे नाव राजकारणासोबतच देशपातळीवर फुटबॉलमुळेही ओळखले जाते.हौशी व्यापारीवर्ग व फुटबॉलप्रेमी लोकांनी मनोरंजनाची साधने त्यावेळी नसल्याने काही व्यापारीलोकांनी एकत्र येत आजच्या स्टेडीयमच्या जागेवर फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्यास सुरवात केली होती.त्या सुरवात केलेल्या या खेळाने सुर्वणमहोत्सवाचा कार्यकाळ गाठला आहे.त्यातच पोलिस विभागाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शहीद जवान फुटबॉल स्पर्धेमुळे आता पुन्हा फुटबॉलप्रेमीमंध्ये नवा उत्साह संचारला असून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.त्यातच देशपातळीवर ऑल इंडिया फुटबॉल अशो.चे अध्यक्ष प्रफुल पटेल असले तरी त्यांनी त्या पदाचा उपयोग गोंदियातील फुटबॉलला नावलौकिक मिळवून देण्यासोबतच टिकवून ठेवण्यासाठी आत्ताही अनं त्यापूर्वीही कधीही प्रयत्न न केल्याची खंत सुद्धा अनेक जुन्या फुटबॉलप्रेमींनी बेरार टाईम्सशी संवाद साधताना व्यक्त केली.
नगरपरिषदेला त्यावेळी देण्यात येत असलेल्या करामध्ये अधिकचे २५ पैसे घ्या,पण दरवर्षी फुटबॉलच्या सामन्याकरिता व व्यवस्थेकरिता तो अधिकचा घेतलेला निधी आम्हाला द्या असे सांगत फुटबॉल सामन्यांची सुरवात केली आणि तिथूनच या खेळाला गोंदियाकरांनी डोक्यावर घेतले.मात्र या खेळाला जो राजाश्रय मिळायला पाहिजे तो मिळू शकला नाही.
स्वातंत्र्यपूर्वीपासूनच गोंदिया शहरात फुटबॉलचे सामने व्हायचे. आजच्या घडीला अस्तित्वात असलेल्या अंसारी वॉर्डाच्या नावावर १९७०च्या दशकात अंसार क्लबच्या माध्यमातून फुटबॉल क्लबची सुरवात झालेली होती.त्यातही विशेष म्हणजे या खेळात मुस्लीमसमाजातील खेळांडूची संख्या ही अधिक बघावयास मिळते.अंसार क्लबच्या माध्यमातून चालणारा खेळ हा नंतर गोंदिया सिटी फुटबॉल क्लबच्या नावे सुरू राहिला आणि आजही ते कायम आहे.१९८२ पर्यंत म्हणजे इंदिरा गांधी स्टेडीयमचे बांधकाम सुरू होईपर्यंत फुटबॉलच्या ऑल इंडिया पातळीवरील स्पर्धांनी गोंदियांने चांगलेच नाव गाजविले होते.विशेष म्हणजे मोहन बागान,सेंट्रल बँक मुंबई,बंगळूर,विशाखापटन्नम,नीमच,मणिपूर,आसाम सारख्या भागातील फुटबॉलचे संघ गोंदियात खेळायला यायचे.देशातील प्रत्येक राज्यात नावलौकिक मिळविलेल्या गोंदियाला मात्र १९८२ नंतर उतरती कळा लागली.
विशेष म्हणजे ज्या मैदानावर फुटबॉलचे सामने व्हायचे,त्याठिकाणी आजसारखी बसण्याची सोयीसुविधाही नव्हती.त्यावेळी बांबू व काठ्यांनी तयार केलेल्या बसण्याच्या जागेवर प्रेक्षक बसून स्पर्धा बघायचे.त्यासाठी ५० ते ७५ पैशाची तिकीट सुद्धा विकत घ्यायचे यावरून फुटबॉलप्रती प्रेक्षकांत किती जिव्हाळा होता हे दिसून येते.त्यावेळी झालेला प्रत्येक सामना हा तिकिटाचा राहिलेला होता.१९७० च्या दशकात अंसार क्लबच्या माध्यमातून चालणारा खेळ नंतर गोंदिया सिटी फुटबॉल क्लबच्या नावे सुरू राहिला.आजच्या घडीला गोंदिया शहरात सिटी क्लब गोंदिया, गोंदिया अकादमी,यंग सीटी क्लब,उत्कल क्लब व एसीसीआर क्लब सारखे फुटबॉल क्लब स्वबळावर खेळाडूंना घडविण्याचे कार्य करीत आहेत.त्यांना शासनाकडून जी मदत मिळायला पाहिजे ती सुद्धा पाहिजे त्याप्रमाणात मिळत नसल्याने कमी संख्येतील खेळाडूच राष्ट्रीय पातळीवर आपले नावलौकिक करू लागले आहेत.
खेळाडू घडविले,नोकèया मिळविल्या
गोंदियाच्या फुटबॉल खेळाच्या इतिहासाकडे बघितल्यास अजिजभाई लालनी यांच्या अध्यक्षतेखालील क्लबने अनेक खेळाडू घडविले.आज त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांनी ही जबाबदारी सांभाळली आहे.अजिजभाईनी सहकारी भगवती महाराज,काकुभाई,प्रा.कमल पाराशर,मटरु भैय्या आदींच्या सोबतीने ऑल इंडिया स्तरावरील फुटबॉल स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले होते.यापैकी काही सदस्य आज या जगात नसले तरी फुटबॉलच्या क्षेत्रातील प्रत्येक व्यक्ती त्यांचे नाव घ्यायला विसरत नाही.त्यातच सध्याच्या युवावस्थेतील खेळाडूकडे बघितल्यास राष्ट्रीय स्तरावर आपली छाप छोडणाèया खेळाडूमध्ये शोएब सय्यद अल्ताफ अहमद या खेळाडूने दुबईच्या एका क्लबकडून खेळण्याचा मान मिळविला आहे.सोबतच दुंरदो कप व भूतानच्या राजघराण्याकडून आयोजित qकग्ज कप स्पर्धेतही सहभाग घेतला आहे.तर पोलिस कर्मचाèयाचा मुलगा असलेला भुवनेश शेंद्रे या खेळाडूने भारताच्या अंडर १६ या गटात ज्युनिअर इंडिया संघात कामगिरी बजावली.त्याने जॉर्डन येथे झालेल्या अंडर १६ वेस्ट एशिया फुटबॉल स्पर्धेत इराक विरुद्धच्या सामन्यात १ गोल करून भारताला विजय मिळवून दिला होता.तर अंडर १७ स्पर्धेत मलेशिया येथेही सहभागी झालेला होता.तर तिसरा युवा खेळाडू उमेर सय्यद शकील अहमद हा सुब्रतो कप स्पर्धा खेळला असून कोलकताच्या नामाकिंत एटीके संघाकडून तो खेळत आहे.
अजिजभाई लालानी यांच्या अध्यक्षतेखालील फुटबॉल क्लबने आजपर्यंत अनेक खेळाडू घडविले त्यामधील अनेकांना रेल्वे व मॉयलमध्ये नोकरीही लागलेल्या आहेत.त्या खेळाडूमध्ये गोंदिया सिटी क्लबचे कप्तान शकीलभाई,गोतारिया,मुमताज खान,बिरजलाल शंकवार,राधे पहेलवान,सज्जाद पहेलवान,प्रा.कमल पाराशर,शब्बीरभाई,अल्ताफ अहमद,शकील अहमद,इक्बाल खान,मानqसग,टुडूदादा,अब्दुल फराह,स्व.मोवीनभाई,हबीबभाई,खुर्शिदभाई,कोनहार,स्व.चंदन,चिचूभाई जसानी,जयेश पतींगे,विनोद तिवारी,बनवारी,खुर्शीदभाई,प्रा.मृत्युंजयqसह यांचे नावे घेतल्याशिवाय गोंदियाच्या फुटबॉलचा इतिहास पूर्ण होऊ शकत नसल्याचे इक्बाल अहमद यांनी सांगितले.त्यातच कधीही स्वतः खेळले नाही परंतु खेळाडूंना नेहमीच सहकार्य करण्यासाठी तत्पर असणारे बनवारीलाल खंडेलवाल यांचेही योगदान महत्त्वाचे आहे.