भाजपकडून काँग्रेसने हिसकावल ब्रह्मपुरी नगरपालिका

0
10
संंपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागून असलेल्या ब्रम्हपुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. एकूण ३० हजार ८१५ मतदार होते. त्यापैकी २१ हजार ७३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १०७ उमेदवार रिंगणात होते. सोमवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी सुरू झाली. दुपारपर्यंत संपूर्ण निकाल समोर आला. नगराध्यक्षच्या थेट निवडणुकीत काँग्रेसच्या रिता उराडे यांनी तीन हजार ५५० मतांनी विदर्भ माझा पार्टीच्या अर्पिता दोनाडकर यांचा पराभव केला. रिता उराडे यांना ८०२० तर अर्पिता दोनाडकर यांना ४४७० मते मिळाली. भाजपाचे अश्विन लाखानी ३८७२ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. नगरसेवक पदाच्या २० जागांपैकी ११ जागा काँग्रेसने पटकाविल्या. विमापाला सहा तर भाजपाला तीन जागांवरच समाधान मानावे लागले.
ब्रम्हपुरी नगरपरिषदेतील प्रभाग निहाय विजयी उमेदवार याप्रमाणे-   प्रभाग क्र – १ विलास विखार (पंजा) – १५६५ मते (विजयी),सपना क्षेत्रे (अंगठी) – ११७३ मते (विजयी)
⦁    प्रभाग क्र – २ लताताई ठाकूर (पंजा) – १०२६ (विजयी)  सागर आमले  (कमळ) – ६९८ (विजयी),⦁    प्रभाग क्र – ३ सारिताताई पारधी (पंजा) – ९९७ (विजयी) बाला शुक्ला (पंजा) – ९३४ (विजयी),⦁    प्रभाग क्र – ४ वनिताताई अलगदेवे (पंजा) – १०६१ (विजयी) प्रीतिष बुरले (पंजा) – ७४२ (विजयी),⦁    प्रभाग क्र – ५ अशोक रामटेके (छताचा पंखा) पंजा – ९११ (विजयी) नीलिमा सावरकर (पंजा) – ६६२ (विजयी),⦁    प्रभाग क्र  ६ सतीश हुमने (अंगठी) – ७९८ (विजयी) अर्चना खंडाते (अंगठी) – ६९३ (विजयी),⦁    प्रभाग क्र – ७ रुपाली रावेकर (अंगठी) – ९९२ (विजयी) नितीन उराडे (पंजा) – ८७६ (विजयी),⦁    प्रभाग क्र – ८ पुष्पा गराडे (कमळ) – ७२४ (विजयी) मनोज वठे (कमळ) – ६६८ (विजयी),⦁    प्रभाग क्र – ९
सुनीताताई तिडके (पंजा) – ११८९ मते (विजयी) गौरव भैया (अंगठी) – (विजयी) ,⦁    प्रभाग क्र – १०   महेश भर्रे (पंजा) – ८४६ मते (विजयी) अंजली उरकुडे (अंगठी) – ७०४ मते (विजयी) यांचा समावेश आहे.