मध्यप्रदेशात भाजप व काँग्रेस पक्षांमध्ये रस्सीखेच

0
10

भोपाळ(वृत्तसंस्था)दि.11 – मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये अटीतटीची लढत असल्याचे पाहायला मिळत आहे. कधी काँग्रेस तर कधी भाजप पुन्हा आघाडी घेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मतमोजणीच्या अखेरच्या फेऱ्यांमध्ये नेमके कसे चित्र समोर येते यावर आता मध्यप्रदेशचे भवितव्य अवलंबून असणार आहे.दरम्यान, मध्यप्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या घरी काँग्रेसच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत सत्ता स्थापना आणि मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला ज्योतिरादित्य सिंधिया आणि दिग्विजय सिंह यांचीही उपस्थिती असल्याची माहिती मिळाली आहे.

मध्यप्रदेश – असे आहेत निकाल

पक्ष

आघाडी

निकाल

2013 ची स्थिती

भाजप 108 0 165
काँग्रेस 115 0 58
इतर 7 0 7
एकूण 230/230 0 230

असे होते मध्यप्रदेशचे एक्झिट पोलचे अंदाज

मध्यप्रदेशात 230 जागा आहेत. 28 नोव्हेंबरला झालेल्या मतदानात 75 टक्के मतदारांनी मतदान केले. 2013 मध्ये भाजपने 165 आणि काँग्रेसने 58 जागा जिंकल्या होत्या.

सर्वे भाजप काँग्रेस इतर
अॅक्सिस माय इंडिया-इंडिया टुडे 102-122 104-122 4-11
टाइम्स नाऊ-सीएनएक्स 126 89 15
एबीपी-लोकनिती 94 126 10
इंडिया न्यूज-नेता 106 112 12
रिपब्लिक 108-128 95-115 7
न्यूज नेशन 110 107 13

– भाजपने मध्यप्रदेशात आतापर्यंत 5 वेळा सत्ता स्थापन केली आहे.
– शिवराज मध्य प्रदेशातील सर्वात दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेले नेते आहेत.
– शिवराज सिंह चौहान 13 वर्षापासून राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तर 15 वर्षांपासून राज्यात भाजपची सत्ता आहे.
– राज्यात यावेळी विक्रमी 75% मतदान झाले आहे.