शिवराज सिंह चौहान यांचा राजीनामा;काँग्रेसला राज्यपालांचे निमंत्रण

0
13

भोपाळ(वृत्तसंस्था)दि.12 – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी अखेर आपला पराभव मान्य करीत स्पष्ट बहुमत न मिळाल्याने मध्य प्रदेशात सरकार स्थापन करण्याचा दावा करणार नाही,अशी माहिती शिवराज सिंह चौहान यांनी पत्रपरिषदेेत दिली. शिवाय, पराभवाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामाही राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. तब्बल 15 वर्षांनंतर चौहान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी, आता मी मुक्त आहे, अशी प्रतिक्रियाही दिली. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर शिवराज सिंह चौहान म्हणाले की, मी राजीनामा दिला आहे. निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी केवळ माझी आहे. पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतली होती.

दरम्यान मध्य प्रदेश राज्यात काँग्रेस पक्षाला मायावतींनी पाठिंबा जाहीर केल्याने त्यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. आता मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी दुपारी 12 वाजता काँग्रेसला भेटण्यास बोलावले असून, काँग्रेस या भेटीदरम्यान सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे.काँग्रेस नेत्यांनी काल रात्रीच आनंदीबेन पटेल यांच्या भेटीची वेळ मागितली होती. त्यानुसारच मध्य प्रदेशाच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी काँग्रेस शिष्टमंडळाला दुपारी 12 वाजता भेटण्याची वेळ दिली आहे. काँग्रेसकडून शिष्टमंडळात कमलनाथ, ज्योतिरादित्य सिंधिया, दिग्विजय सिंह, विवेक तन्खा यांचा समावेश असणार आहे.