राहुल क्लब नागपूर,युनियन बँक मुबंई,यंग मुस्लीम क्लब नागपूर,अमरावती व पुणे विजयी

0
15
गोंदिया,दि.१2-येथील इंदिरा गांधी स्टेडीयम येथे गोंदिया जिल्हा पोलीस विभाग व जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या संयुक्त विदयमाने आयोजित ‘राज्य स्तरीय शहीद जवान फुटबॉल स्पर्धेच्या दुसèया दिवसाच्या सामन्यांना पावसचा फटका बसल्याने रात्री उशीरा सामने खेळविण्यात आले.मंगळवारला यंग सिटी गोंदिया विरुध्द इंडिपेंडस फुटबॉल क्लब अमरावती सामन्यात अमरावती संघाने विजय मिळविला.सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुबंई विरुध्द रब्बानी फुटबॉल क्लब कामठी सामन्यात सेंट्रल बॅंक आॅफ इंडियाने तर बाम्बे इंजिनियरींग गृप एफसी पुणे विरुध्द गोंदिया फुटबॉल अकादमी गोंदियात सामन्यात पुणे संघाने गोंदियाचा पराभव केला.
 दुसèया दिवशी आयोजित सामन्यामध्ये इंदिरानी स्पोर्टस क्लब पुणे विरुध्द राहुल फुटबॉल क्लब नागपूर यांच्यात झालेल्या सामन्यात राहुल फुटबॉल कल्ब नागपूरने ५-४ ने सामना जिंकला.सामनाच्या वेळेत एकाही संघाने गोल न केल्याने दोन्ही संघाला पेनाल्टी कार्नर मिळाले.त्यामध्ये राहुल फुटबॉल क्लबने पेनाल्टी सुटच्या माध्यमातून ५ गोल केले तर इंदिरानी स्पोर्टस क्लब पुणे ने ४ गोले केले.त्यानंतर  बँक ऑफ इंडिया संघाने उत्कल संघ गोंदियाचा ४-० अशा पराभव केला या सामन्यात युनियन बँक संघाकडून पेंटल सोनी याने दोन व अथांग काणेकर व ग्लकसन यांनी प्रथ्येकी एक एक गोले केले.
तिसरा सामना डब्लींग फुटबॉल क्लब गोंदिया विरुध्द यंग मुस्लीम फुटबॉल क्लब नागूपर यांच्यात झाला.यात यंग मुस्लीम क्लब नागपूरने ४-१ अशा फरकाने सामना qजकला.संघाकडून यश शुक्ला याने ३ गोली करीत हॅट्रीक मारली तर फुझेल पाशा याने १ गोल मारला.तर डब्लींग संघाकडून यशपाल चहांदे याने एकमेव गोल गेला.
पहिल्या दिवशी रात्रीला झालेल्या महिला संघांच्या प्रदर्शनीय सामन्याची सुरुवात इंडीयन मेडीकल असोसिएशन अध्यक्षा डॉ. जयपुरीया व लायन्स क्लब गोंदियाच्या अध्यक्षा सविता अग्रवाल यांचे हस्ते करण्यात आली.या सामन्यामध्ये नागपुर महिला संघाने गोंदिया महिला फुटबॉल संघाचा १-० अशा फरकाने पराभव केला.या सामन्यामध्ये नागपूर फुटबाल संघाच्या महीमाने एकमेव गोल केला.त्यानंतरच्या यंग बॉईज फुटबॉल क्लब औरंगाबाद संघाकडून वारेक अहमद व आर्यन बावेजा यांनी प्रत्येकी एक एक गोल केला. रविवारच्या रात्रीला व सोमवारला सकाळच्या सुमारास आलेल्या पावसामुळे मैदान ओले झाल्याने फुटबॉलचे सामने उशीरा सुरु करण्यात आले.त्यात पहिल्या दिवशी उदघाटनानंतर झालेला सामना नागपूर अकादमीने अमरावती एंजलचा पराभव करुन जिंकला होता.त्यानंतर झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात नागपूर महिला संघाने गोंदिया महिला फुटबॉल संघाचा पराभव केला.तर यंग बाईज फुटबॉल क्लब औरगांबाद विरुध्द सिटी क्लब गोंदियामध्ये झालेल्या सामन्यामध्ये औरगांबाद संघाने सिटि क्लब गोंदियाचा २-० ने पराभव केला.