अधिकारी, कर्मचारींच्या निवासस्थानांची दुरुस्ती कशासाठी ?

0
8
गोंदिया,(पराग कटरे),दि.14ः-     सालेकसा तालुका हा  नक्षल दृष्ट्या अतिसंवेदनशील व मागास म्हणून ओळखला जातो. तालुक्याची अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यप्रणालीने अतिशय दयनीय अवस्था झाल्याचे दिसून येत आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आमगाव,  गोंदिया, नागपूर येथून होत असलेले  *अपडाऊन* !  कर्मचारी व अधिकारी यांचे होत असलेल्या  अपडाऊनमुळे कार्यालयांची  कामे वेळेवर सुरळीत पार पडत नाही. सुट्टीवर नसतानाही सुट्टी मारण्याचे काम अधिकारी व कर्मचारी करत असतात. कार्यालयांमध्ये कामानिमित्त गेलेल्या सर्वसामान्य नागरिकांशी होणारी असभ्यतेची भाषा आणि बोटावर मोजण्या पुरते काम करणारे कर्मचारी व अधिकारी सोडले तर सर्वच अपडाऊन मध्ये व्यस्त असल्यानंतरही शासकीय निवासस्थान दुरुस्तीच्या नावावर लाखोच्या पैशाची उधळपट्टी का केली जात आहे अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे.