फुटबॉल स्पर्धेत नागपूरचे तिन्ही संघ उपांत्य फेरीत

0
17

गोंदिया,दि.१४ः-येथील इंदिरा गांधी स्टेडीयमवर सुरु असलेल्या राज्यस्तरीय शहीद जवान फुटबॉल स्पर्धेत बुधवारी सायकांळी प्रथम उपांत्यपुर्व सामन्यात नागपूर फुटबॉल अकादमी संघाने सिटी क्लब गोंदिया संघावर १-० अशी मात केली.द्वितीय सामन्यात राहुल फुटबॉल क्लब नागपूर संघाने युनियन बँक मुबंई संघावर १-० ने मात करीत उपांत्य फेरीत धडक मारली.तर गुरुवारी खेळल्या गेलेल्या तृतीय उपांत्यपुर्व फेरीच्या सामन्यात यंग मुस्लीम फुटबॉल क्लब नागपूर संघाने इंडिपेन्डस फुटबॉल संघ अमरावतीवर ७-१ अशी रोमहर्षक मात करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला.नागपूर फुटबॉल अकादमी विरुध्द सिटी क्लब गोंदिया सामन्याची सुरवात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण,बिरसी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक संचिन खंगार आणि एनएफटीचे जनरल मॅनेजर संदिप साबळे यांच्या हस्ते झाले.या सामन्यात नागपूर फुटबॉल संघाकडून शाहरुख अन्सारी याने एकमेव गोल केला.पहिल्या सामन्यानंतर केशोरी येथील आश्रमशाळेच्या विद्याथ्र्यांनी गोंडीनृत्य सादर केले.द्वितीय सामन्यात राहुल क्लबच्या क्रिस्तोफर पूटर याने एकमेव करीत संघाला विजय मिळवून दिला.या सामन्याची सुरवात शहिद शिपाई सागर राऊत यांचे वडील रतीराम राऊत व आई शोभा राऊत व कुटुबियांच्या हस्ते करण्यात आले.