72 वर्षांचे कमलनाथ होणार मध्यप्रदेशचे 18 वे मुख्यमंत्री

0
6

भोपाळ(वृत्तसंस्था)दि. दि. १४ : मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्र्यांची नावे ठरवण्यासाठी गुरुवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या घरी १२ तास मॅरेथॉन बैठका झाल्या. कमलनाथ व ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या दावेदारीवर सोनिया गांधी व प्रियंका वाड्रा यांच्याशी खलबतांनंतर राहुल यांनी सायंकाळी ७:५७ वाजता ट्विट केले. त्यात ते म्हणाले, संयम व वेळ हे सर्वात शक्तिशाली योद्धे आहेत. यानंतर सिंधिया व कमलनाथ भोपाळला परतले. रात्री ११:१४ वाजता काँग्रेसने ७२ वर्षीय कमलनाथ मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा केली. ते १५ डिसेंबरला पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

छत्तीसगडमध्ये सिंहदेवांचे नाव पुढे,वोरा यांचा ओबीसी नेते बघेल यांना विरोध 
माध्यमांतील वृत्तांनुसार, छत्तीसगडमध्ये टी.एस. सिंहदेव यांचे नाव सर्वात आघाडीवर होते. कारण मोतीलाल व्होरा यांचा प्रदेशाध्यक्ष भूपेश बघेल यांच्या नावाला विरोध म्हणजे वोराचा ओबीसी नेतृत्वाला विरोध असल्याची टिका होऊ लागली आहे. मात्र बहुतांश आमदार भूपेश बघेल यांच्या पाठीशी आहेत. भूपेश बघेल समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले.राहुल गांधी यांनी कमलनाथ आणि सिंधियांसाेबत हा फाेटो ट्विट केला. यात कमलनाथांचे स्मित स्पष्ट ग्वाही देते की मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली आहे.

दुसरीकडे, राजस्थानात अशोक गहलोतांचे नाव निश्चित झाले होते. गहलोत व सचिन पायलट राहुल यांच्या भेटीनंतर जयपूरला निघाले. मात्र ७ वाजता त्यांना विमानतळावरून बोलावण्यात आले. यानंतर राहुल यांच्या घरी रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू राहिल्या.जयपूर विमानतळावर गहलोत आणि पायलट समर्थकांनी घोषणाबाजी केली. त्यांच्यात हाणामारी होऊ नये यासाठी मोठ्या संख्येने पोलिस तैनात करण्यात आले. गहलोतांना मुख्यमंत्री केल्याचे संकेत मिळाल्यानंतर पूर्व राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांच्या महामार्गावर रस्ता जाम करून निदर्शने करण्यात आली.