देवरीत ३९ किलो तंबाखू जप्त

0
10

गोंदिया,दि.१४ः- तालुका व नगरपंचायत मुख्यालय असलेल्या देवरी येथे तत्कालीन उपविभागीय अधिकारी गजानन राजमाने यांच्या कार्यकाळात दुकानातून तंबाखूजन्य पदार्थ विकण्यावर लगाम लागलेली होती.मात्र त्यांच्या स्थानांतरणांनतर पुन्हा हा व्यवसाय जोमाने सुरु झाला असून अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने देवरीतील काही दुकानात टाकलेल्या धाडीमध्ये ३९ किलो सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली आहे.अन्न औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सरकाटे यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात अन्न औषध प्रशासन विभागाचे सुरक्षा अधिकारी अ.दा.राऊत,पियुष मानवटकर,सहाय्यक एन.डी.बारसागडे,देवरी पोलीस ठाण्याचे शिपाई ध.ग.भुरे यांनी मंगळवारला ही कारवाई केली.देवरी येथील कारगील चौकातील मे.शाह ट्रेडर्सचे संचालक लक्ष्मण मोतीलाल साहू यांने तंबाखू ,चिव्हींग टोबकोचा साठा करुन ठेवलेला होता.४११ चिव्हींग टोबॅको २०० ग्रम वजनाचे ८११ पॅकेट होते.त्या पॅकेटवर उत्पादनाची तारीखही नव्हती.तो पुर्ण साठा जप्त करण्यात आला.विशेष म्हणजे अन्न औषध विभागाचे पियुष मानवटकर हे त्या दुकानात ग्राहक बनून गेलेले होते.त्यांनी २०० ग्रम तंबाखु ५०० रुपयाला विकत घेतला.त्या तंबाखूचे ५०० रुपये त्यांनी त्या व्यापाèयाला देत खरेदीचे बिलही घेतले.या तंबाखूचे चार नमुने घेण्यात आले.या व्यापाèयाकडून १७७ पँकेट जप्त करण्यात आले.तर चार पॅकेट नमुन्यासाठी वेगळे ठेवले.३५ किलो ४०० ग्रम वजन असलेल्या तंबाखूची किमत २१ हजार २४० रुपये एवढी आहे.तर दुसरी कारवाई दुर्गा चौकातील गणेश किराणा स्टोर्स बाजार चौक येथे करण्यात आली.हे संदीप निरजंनलाल अग्रवाल यांच्या मालकीचे दुकान असून चिव्हींग टोबॅको ३.२किलो किमत १९२० रुपये,स्वीट सुपारी ३.७८० किलो २१६० रुपये किमतीची असे ४०८० रुपयाचा माल जप्त करण्यात आला.त्या दुकानातूनही नमुने ताब्यात घेण्यात आले.या दोन्ही विक्रेत्यावर देवरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सदर कारवा