थकबाकीदाराविरोधात महावितरणची धडक मेाहिम;थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत

0
7

गोंदिया,दि.१४-महावितरणच्या गोंदिया परिमंडळात थकबाकीदारांविरोधात धडक मोहिम राबविण्यात येत असून ग्राहकांनी वीजबिल वेळेत भरून महावितरणला सहकार्य करण्याचे  महावितरणच्या   गोंदिया परिमंडळात थकबाकीदारांविरोधात धडक मोहिम राबविण्यात येत असून ग्राहकांनी वीजबिल वेळेत भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वीज बिलांचा  भरणा करण्यासाठी महावितरणद्वारा ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट, माबाईल अॅप, एनी टाईम पेमेंट मशीन्स यासारख्या ग्राहकाभिमुख सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून ग्राहकांचा प्रतिसादही या सुविधांना चांगल्याप्रकारे लाभत असल्याचे चित्र आहे परंतु अनेक थकबाकीदारांची थकबाकी साचवून ठेवण्याची सोय महावितरणची डोकेदुखी वाढविणारी आहे. वीजबिल वसुली, वीजचोरी पकडणे अशा अनेक कामात महावितरणच्या उर्जा अशा थकबाकीदारांमुळे खर्ची जात आहे. वीजबिल वेळेवर भरण्याचे कर्तव्य समजून वेळेवर वीजबिल भरणारे ग्राहक एकीकडे तर थकबाकीदार दुसरीकडे विकल्या गेलेल्या वीजेच्या प्रत्येक युनिटची बिजबिलाच्या माध्यमातून वसुली करून परत वीज विकत घेवून प्रामामणिक ग्राहकांना वीजपुरवठा करण्याची जवाबदारी पार पाडतांना थकबाकीदारामुळे महावितरणला अडचणीचा सामना करावा लागत आहे. महावितरणच्या  गोंदिया परिमंडळात घरगुती ग्राहकांकडे थकबाकी १२ कोटी ४० लाखांच्या घरात पोहोचली आहे तर वाणिज्यिक गाहकांकडे ६ कोटी ६१ लाख  झाली आहे. औदयोगिक ग्राहकांकडे १ कोटी १७ लाख थकबाकी जमा झाली आहे.

गोंदिया व भंडारा ग्रामिण व शहरी पाणीपुरवठा येाजनेची १ कोटी ४५ लाख तसेच ग्रामिण व शहरी पथदिव्यांची थकबाकी १ कोटी ३५ लाख झाली आहे.महावितरणचा कारभार सुरळीत चालण्याकरिता ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक विजेच्या युनिटची वसुली होणे गरजेचे आहे. वीजग्राहकांकडून वीजबिल विहित मुदतीत वसुल करण्याचे निर्देष देण्यात आले आहेत. सोबतच वसुलीत निष्काळजीपणा बाळगणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यावर कठोर कारवाईचे निर्देष देण्यात आले आहेत.

       वीज ग्राहकांनी वीज देयक छापील दिनांकापासून ७ दिवसाच्या आत भरणा करून वीज देयकाच्या  रकमेत १ % सावलतिचा लाभ घ्यावा तसेच डिजिटल पेमेंट जसे की BHIM, NetBanking, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड मोबाइल बँकिंग ई. द्वारे भरणा करून वीज देयकात ०.२५% ते रु. ५०० /- पर्यन्त सावलतीचा लाभ घ्यावा तसेच ग्राहकांना गो ग्रीन सुविधेचा लाभ घेऊन ऑनलाइन भरणा केल्यास प्रति देयक १०/- रुपयाचा लाभ देण्यात येतो. सर्व थकबाकीदार ग्राहकांनी थकीत असलेले वीजबिल त्वरीत भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन गोंदियापरिमंडळाचे मुख्य अभिय सुखदेव शेरकर यांनी केले आहे. 

             गोंदिया परिमंडळातील ग्राहकनिहाय  व मंडल निहाय एकूण थकबाकी

ग्राहकांची वर्गवारी गोंदिया मंडल      भंडारा  मंडल  एकुण थकबाकी
घरगुती ६ कोटी ३८ लाख ६ कोटी २ लाख १२ कोटी ४० लाख
वाणिज्यिक २ कोटी ४९ लाख ४ कोटी १२ लाख ६ कोटी ६१ लाख
औदयोगिक ५१ लाख ६६ लाख १ कोटी १७ लाख
ग्रामीण व शहरी

पाणीपुरवठा योजना

५० लाख ९५ लाख १ कोटी ४५ लाख
ग्रामीण व शहरी पथदिवे ६८ लाख ६७ लाख १ कोटी ३५  लाख