यंग मुस्लीम नागपूर विरुध्द राहुल क्लब नागपूर दरम्यान आज फायनल

0
21

राज्यस्तरिय शहिद जवान फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना आज
अखिल भारतीय फुटबॉल संघाचे अध्यक्ष पटेल करणार पुरस्कार वितरण

गोंदिया,दि.१४ः- गेल्या रविवारपासून सुरु असलेल्या राज्यस्तरीय शहिद जवान फुटबॉल स्पर्धेच्या उद्या शनिवारला (दि.१५) होऊ घातलेल्या अंतिम सामन्याकरीता राहुल क्लब नागपूर ने आपले स्थान निश्चित केले आहे.येथील इंदिरा गांधी स्टेडीयम येथे ही राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.आज शुकवारला उपांत्य सामने खेळविण्यात आले.त्यामध्ये पहिल्या सामन्यात नागपूर फुटबॉल अकादमी विरुध्द राहुल फुटबाल क्लब नागपूर यांच्यात खेळला गेला.या सामन्यात राहुल फुटबॉल क्लब नागपूरने १-० ने नागपूर फुटबॉल अकादमीचा पराभव केला.राहुल क्लबच्यावतीने राहुल नेवारे या खेळाडूने हा गोल केला.तर दुसरा सामना हा यंग मुस्लीम क्लब नागपूर विरुध्द बॉम्बे इंजिनियरींग गृप एफसी पुणे यांच्यात खेळला गेला.या सामन्यामध्ये यंग मुस्लीम क्लब नागपूर ने १-० ने हा सामना qजकला.पहिल्या हॉपमध्ये यंग मुस्लीम फुटबॉल क्लब नागपूरचा मोहमत सुजात यांनी केलेल्या उत्कृष्ठ गोलमुळे हा विजय मिळाला.
या सामन्याचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नमाद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.रजनी चतुर्वेदी,भारतीय फुटबाल संघाचे माजी खेळाडू व नागपूर अकादमी फुटबाल क्लबचे प्रशिक्षक अब्दुल खालिद,पोलीस अधिक्षक हरिष बैज, होटल गेटवेचे व्यवस्थापक राज वामन,डॉŸ.शैलजा दयानिधी उपस्थित होते.
या सामन्याला १९९३-९४ मध्ये बेरुत येथे झालेल्या वल्डकप क्वालीफायनल,मद्रास येथे झालेल्या सेफ गेम,काठमांडू येथे झालेल्या साऊथ आशियाई गेम्स,बँकाक येथे झालेल्या आशियाई गेम्स मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे अब्दुल खालीद उपस्थित होते.त्यांनी मोहन बागानच्यावतीने ४ वेळा,संतोष ट्रापीमध्ये ९ वेळा,मोहम्मदान स्पोर्टेस क्लबच्यावतीने ४ वेळा भाग घेतला असून एसईसीआर नागपूर संघाकडून ते खेळत असून प्रशिक्षक सुध्दा आहेत.या सामन्यातील सर्व मान्यवरांचे स्वागत पोलीस अधिक्षक हरिष बैजल यांनी केले.तसेच सामन्यानंतर देवरी येथील शासकीय आदिवासी वसतीगृहाच्या मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
दुसरा सामना हा यंग मुस्लीम क्लब नागपूर विरुध्द बॉम्बे इंजिनियरींग गृप एफसी पुणे यांच्यात पार पडला.यामध्ये यंग मुस्लीमने पहिल्यापासूनच आघाडी घेत पुणे संघाला थांबवून ठेवले होते.पहिल्या हॉपपुर्वीच १ गोल करुन आघाडी घेतली होती.या सामन्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ.कादबंरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अदानी पावर प्रोजेक्टचे व्यवस्थापक सी.पी.साहू,पोलीस अधिक्षक हरिष बैजल,अति.पोलीस अधिक्षक संदिप आटोळे,श्रीमती बैजल,शहिद जवान पोलीस शिपाई रामा गावडकर यांची पत्नी रत्नकला गावडकर,मुलगा प्रशांत गावडकर व कुटूबिंय,उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते आदी मान्यवर उपस्थित होते.हा सामन्या सुरु होताच प्रेक्षकांमध्ये उत्साह दिसून आला.दोन्ही संघ चांगल्या खेळाचे प्रदर्शन करीत असल्याने प्रेक्षकामध्ये उत्कंठा असतानाच सामन्याच्या अर्धा तासानंतर यंग मुस्लीम क्लब नागपूरच्यावतीने पहिला गोल करण्यात आला होता.

स्पर्धेचा शनिवारला सायकांळी ६ वाजता समारोप
या स्पर्धेचा समारोप व बक्षिस वितरण सोहळा राज्यसभा सदस्य व अखिल भारतीय फुटबॉल संघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या हस्ते राज्याचे सामाजिक न्याय व सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.कार्यक्रमाला खासदार मधुकर कुकडे,अशोक नेते,जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी,आमदार गोपालदास अग्रवाल,संजय पुराम,विजय रहागंडाले,डॉ.परिणय फुके,पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश qशदे,जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी आदि मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक हरिष बैजल यांनी दिली.