धानाच्या योग्य हमीभावासाठी एकत्र याःजयश्री वेळदा

0
10

गडचिरोली,दि.15ः- धान उत्पादक शेतकरी गटातटाच्या राजकारणात विखुरलेला असल्याने सरकार धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असून पश्चिम महाराष्ट्रातील उस,दुध उत्पादक शेतकऱ्यांसारखे एकत्र येऊन धानाच्या हमीभावासाठी संघर्ष करावा लागेल, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्री वेळदा यांनी केले.
तालुक्यातील मौजा गुरवळा येथील फ्रेंन्डस् नाट्य कला मंडळाद्वारा आयोजित संघर्ष संपला रक्ताचा या नाटकाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स.सभापती दुर्लभाताई बांबोडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शेकापचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, विधानसभा चिटणीस नरेश मेश्राम, रोहिदास कुमरे, पुरोगामी महिला संघटनेच्या जिल्हा चिटणीस अर्चना चुधरी, ओबीसी जागृती अभियानाचे समन्वयक दिनेश बोरकुटे,गुरवळा च्या सरपंच निशा आयतुलवार,विहिरगावच्या सरपंच प्रिती कन्नाके,निर्मला गेडाम, रेखा मंटकवार,पुरुषोत्तम रामटेके,नवयुवक विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज कवठे, ग्रामसेवक बारसागडे,अनिल कोठारे, अशोक वासेकर, शांताराम चिकराम,प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन मंडळाचे कार्यकर्ते विनोद मेश्राम यांनी केले. यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मंटकवार,रमेश गेडाम, राकेश इटकेलवार,नरेंद्र मेश्राम,गिरीधर हजारे, बंडू कन्नाके, अनिल पोवनवार,गजानन अडेंगवार,सुरेश भोयर,लालाजी तुंकलवार,चंद्रकांतभोयर, बाबनवाडे,धनराज भोपये यांनी परिश्रम घेतले.