भूपेश बघेल छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री, काँग्रेसकडून घोषणा; सोमवारी शपथविधी

0
13
रायपूर(वृत्तसंस्था) दि.16 :- छत्तीसगडच्या मुख्यमंत्री पदासाठी भूपेश बघेल यांची निवड करण्यात आली आहे. सीएम पदासाठी टीएस सिंह देव, ताम्रध्वज साहू आणि चरणदास महंत यांच्याही नावांची चर्चा होती. परंतु, या 4 जणांमध्ये बघेल यांना सर्वाधिक पसंती मिळाल्यानंतर काँग्रेसने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या विरोधात बघेल यांनी सर्वात मोठा संघर्ष केला होता. त्यांनीच अजीत जोगी यांच्या नवीन पक्षाकडून मिळालेले आव्हान पेलले आणि शेवटी काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्री पद बहाल केले आहे. दिल्लीला जाण्यापूर्वी बघेल यांनी एक ट्वीट केले होते. त्यामध्ये ते म्हणाले, होते, की दिल्लीला हसताना जातोय, हसतमुखानेच परत येईन. त्यांचे हे वाक्य आता तंतोतंत खरे ठरले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बघेल कुर्मी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात युवा काँग्रेससोबत केली होती. दुर्ग जिल्ह्यात राहणारे भुपेश युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते.
– त्यांनी 1990 ते 1994 पर्यंत जिल्हा युवक काँग्रेस कमिटी, दुर्ग (ग्रामीण) चे अध्यक्ष पद सांभाळले. 1993 ते 2001 पर्यंत ते मध्यप्रदेश हाउसिंग बोर्डचे संचालक सुद्धा होते.
– 2000 मध्ये छत्तिसगड मध्य प्रदेशातून वेगळा राज्य बनला. तेव्हा पाटन येथील विधानसभा मतदार संघातून निवडून आले. याचवेळी कॅबिनेट मंत्री सुद्धा होते.
– 2003 मध्ये काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर भुपेश यांना विरोधी पक्षाचे उपनेते करण्यात आले. 2014 मध्ये त्यांना छत्तीसग काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आले. तेव्हापासून ते या पदावर कार्यरत होते.