शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना घेऊन बीडीओना निवेदन

0
23

सांगली/जत,दि.१७ः-महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी पंचायत समितीच्या सौ.अर्चना वाघमळे यांना संघटनेच्या वतीने निवेदन देऊन शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून प्रलंबीत प्रश्न सोडविण्याविषयी मागणी केली.यावेळी संघटनेच्या मार्गदर्शिका पंचायत समितीच्या सदस्या-श्रीदेवी जावीर यांनी बुके देऊन सत्कार केले. यावेळी शिक्षण विभागात शिक्षकांची सेवापुस्तके बऱ्याच वर्षे झाले नोंदी अपूर्ण आहेत.त्या नोंदी आज अखेर पुर्ण करून घ्यावेत. सर्वशिक्षा अभियान अंतर्गत शाळा बांधकाम पूर्ण झालेल्या आज अखेर एम. बी.पुर्ण झालेल्या शाळा खोल्यांची फायनल बीले मिळावेत. जिल्हा परिषद शाळांची वीज बीले चौदाव्यावित्त आयोगातून भरण्यासंदर्भात ग्रामपंचायत कार्यलयाना आदेश मिळावा. याविषयी मागणी केली यावेळी बी.डी.ओ./अर्चना वाघमळे यांनी सर्व प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले.यावेळी तालुकाध्यक्ष-सुनील सुर्यवंशी, तालुका नेते-शरण जावीर, जिल्हा कार्याध्यक्ष-दिलीपकुमार हिंदुस्थानी,संतोष काटे आदीं उपस्थित होते.