महार रेजिमेंटच्या शौर्याचे म्युझीयम करा – मुख्यमंत्री

0
58

मुंबई,दि.१7 – महार रेजिमेंटने सर्वासाठी आणि देशासाठी फार मोठी कामगिरी केलेली आहे.त्याचा गौरव करण्याचा मान प्रथमच महाराष्ट्राने मिळविला.या महार रेजिमेंटचे म्युझीयम करा. असे स्पष्ट करीत छतपती शिवाजी महाराजांनीही आपल्या सैन्यात मोठ मोठ्या जबाबदा-या महार सैनिकावरच सोपविल्या होत्या.तर रायगडचा किल्लेदार शहनाक महार असल्याचे सांगून संभाजी महाराजांनीही महार सैनिकांवर मोठी जबाबदारी सोपविली होती.नागेवाडीचे महार खर्ड्याची लढाई,भिमा कोरेगावची लढाई हे फार मोठं शौर्य महार बटालीयनला जाते.असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महार बटालीयनच्या अमृत महोत्सवी काढले.यावेळी ५१ शौर्य प्राप्त सैनिकांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा गौरव समारंभ मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते झाला.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपुर आणि डाॅ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे आयोजित महार रेजिमेंट शौर्य पुरस्कार प्राप्त सैनिकांचा गौरव समारंभात गेट वे ऑफ इंडिया येथे ते बोलत होते.यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले,केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे,सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले,राज्यमंत्री दिलीप कांबळे,माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर,आमदार राज पुरोहित,राहुल नार्वेकर,तसेच सैन्य दलातील प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की,पहिल्या महायुध्दानंतर महार बटालियन बंद करण्यात आली होती.मात्र १९४१मध्ये सैनिक कल्याण बोर्ड समितीमध्ये सल्लागार म्हणून काम करण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी इंग्रजांना महार रेजिमेंटच्या शौर्य गाथा सांगितल्यावर इंग्रजांनी महार रेजिमेंटची पुनश्च स्थापना केली.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महार रेजिमेंटने केलेल्या कामगिरीचा आणि शौर्य पुरस्कारांची माहिती दिली.शौर्य आणि त्यागाच्या जोरावरच भारताचा इतिहास आहे.म्हणून त्या शौर्याचा आपणा सर्वांना स्वाभिमान आहे.म्हणून महार रेजिमेंटचा गौरव करण्याचा मान महाराष्ट्राचा आहे.यातून तरूणांनी प्रेरणा घेऊन सैन्यात भरती व्हावे असे आवाहन त्यांनी केले.२६ जानेवारी १५ ऑगस्ट या राष्ट्रीय सनादिनी गावातील माजी सैनिकांचा सन्मान करण्यात यावा अशा सुचना आपण दिल्या असल्याचे सांगून महार रेजिमेंटला एक मोठा इतिहास आहे.तेव्हा महार रेजिमेंटचे म्युझियम बनविण्यात यावे.महाराष्ट्र शासन यामध्ये सहकार्य करेल अशा सुचना मुख्यमंत्र्यांनी महार रेजिमेंटचे बिग्रडीयर वाजपेयी यांना दिल्या.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाजासाठी लढत होते तसे ते देशाच्या संरक्षणासाठीही लढत होते.महार रेजिमेंट स्थापन्यात त्यांचा पुढाकार असला तरी महार रेजिमेंटमध्ये फक्त महार सैनिक आहेत असे नाही तर सर्व जातीचे सैनिक आहेत.त्यामुळे इतरांना त्याचा अभिमान आहे.महार बटालियनची आठवण यांनी ठेवल्याने त्याचे आभार व्यक्त करून तरूणांनी इतरत्र नोक-या शोधण्यापेक्षा सैन्यात भरती व्हावे.असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी १९४१ला बेळगाव येथे महार रेजिमेंटची स्थापना झाल्याचे सांगून देशाच्या सर्व सिमेवर चार लाख सैनिक रात्रंदिवस तैनात असतात गस्त घालत असताना त्यांना कधी शत्रूचा हल्ला होईल अन त्यात जीव जाईल याचीही भिती नसते म्हणून आज आपण सगळे सुरक्षित आहोत.देशाची सेवा ही सर्वात मोठी नोकरी आहे.दरवर्षाला ६० हजार सैनिक निवृत्त होतात.४० व्या वर्षी सेवानिवृत्त झाल्यावर अन्यत्र नोकरीची संधी असते तशा सुचना राज्य सरकारला दिल्या जातात.अशी माहिती त्यांना दिली.

सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले म्हणाले की, महार रेजिमेंटच्या पुर्वजाकडून मिळालेल्या शौर्याची परंपरा चालू ठेवणे क्रमप्राप्त वाटते कारण डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे पिता रामजी सुद्धा सैन्यात सुभेदार होते.छत्रपती शिवाजी महाराज तसेच संभाजी महाराज यांच्या काळापासून खर्डा भिमा कोरेगाव तसेच कालच्या कारगिल युद्धापर्यंत महार रेजिमेंटच्या शौर्याचा इतिहास आहे म्हणूनच भिमा कोरेगाव येथील विजयीस्तंभावर महार रेजिमेंटचं चिन्ह कोरले आहे. आपल्या सामाजिक न्याय विभागातून सैन्य भरती मार्गदर्शन तसेच आपीएस आयएएस परीक्षा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी महार रेजिमेंटचा इतिहास सांगितला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी केले.

यावेळी विविध वीरचक्र प्राप्त सैनिकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी मेजर जनरल मनोज ओक,सुधाकरजी,बिनोय पुनेन,निवृत्त ब्रिगेडियर मोहन निकम तसेच समाज कल्याण आयुक्त मिलींद शंभरकर,बार्टीचे कैलास कणसे,उपसचिव ढिंगळे,राजेश ढाबरे आदी विविध क्षेत्रातील अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.