मध्यप्रदेशचे 18वे मुख्यमंत्री म्हणून कमलनाथ यांनी घेतला शपथविधी

0
14

भोपाळ(वृत्तसंस्था)दि.17 – काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेतेपदी निवड झालेल्या कमलनाथ यांनी मध्यप्रदेशचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी भोपाळच्या जंबुरी मैदान येथील सोहळ्यात त्यांना शपथ दिली. कमलनाथ राज्याचा कारोभार स्वीकारल्यानंतर सर्वात पहिला मोठा निर्णय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा घेणार आहेत. पण शीखविरोधी दंगलीप्रकरणी दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयानंतर भाजपने कमलनाथ यांना मुख्यमंत्री बनवण्यास विरोध दर्शवला आहे. न्यायालयाने या दंगलीप्रकरणी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांनी जन्मठेप सुनावली आहे.

या सोहळ्याला कांग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, खासदार ज्योतिरादित्य सिंधिया लोकसभेतील काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, रजीव शुक्ला, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री मल्लिकार्जुन खरगे, राजीव शुक्ला, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या, मंत्री डी शिवकुमार, पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री नारायणसामी, राजस्थानचे नवे मुख्यमंत्री अशोक गहलोत, उप-मुख्यमंत्री सचिन पायलट, आनंद शर्मा, राज बब्बर, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेन्द्र हुड्डा, त्यांचा मुलगा खासदार दीपेंदर हुड्डा, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, अजय सिंह, अरुण यादव, कांतिलाल भूरिया, नवज्योतत सिंह सिद्धू, विवेक तन्खा उपस्थित होते.

शपथविधीत महाआघाडीचे शक्तीप्रदर्शन 
राकाँ : शरद पवार, प्रफुल्ल पटेल
टीडीपी : चंद्राबाबू नायडू
लोजद : शरद यादव
नॅशनल कॉन्फ्ररन्स : फारुक अब्दुल्ला
झारखंड मुक्ती मोर्चा : हेमंत सोरेन
द्रमुक : स्टॅलिन, कनिमोळी आणि टीआर बालू
टीएमसी- दिनेश त्रिवेदी
जेडीएस : माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा, कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमार स्वामी
राजद : तेजस्वी यादव
झारखंड विकास मोर्चा : बाबूलाल मरांडी

भाजपच्या या नेत्यांची उपस्थिती 
शिवराज सिंह चौहान, बाबुलाल गौर, कैलाश जोशी यांचीही उपस्थिती होती. तिघेही मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत.