मुख्यमंत्री बघेल यांच्या बहिणींवर अभिनंदनाचा वर्षाव

0
13

गोंदिया,दि.17:छत्तीसगढचे नवीन मुख्यमंत्री म्हणून भूपेश बघेल यांच्या नावाची घोषणा राहुल गांधी यांनी केली.आणि आज सोमवारला त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.त्या बघेल यांची लहान बहिण प्रा. मीरा रायकवार व भाऊजी प्रा. डि. व्ही.रायकवार हे गोंदिया निवासी असून प्रा.रायकवार हे मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत आहेत. भुपेश बघेल यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागताच गोंदिया येथील नागरिकांनी प्रा. रायकवार यांच्या घरी जावून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.श्रीमती रायकवार या रिंगरोड परिसरात व्हीनस कम्पुटर चालवित आहेत.
रायकवार यांचे स्वागत करण्यासाठी गोंदिया येथील रेल्वे डेली मुव्हर्सचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल, रा हे त्यांच्या घरी गेले होते. यावेळी प्रा. मीरा रायकवार यांनी सांगितले.भुपेश बघेल आणि माझा प्रवेश इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झाला होता. मात्र,भुपेश बघेल अभ्यासात मागे असल्यामुळे त्यांच्या वडीलांनी इंजिनिअर बनू शकत नाही. तर नेता तरी बन, तेव्हापासून माझे वडील भुपेशला मुख्यमंत्र्याच्या रूपात पाहत होते. आता भुपेश ते सिद्ध करून दाखविल्याचे त्या म्हणाल्या.भुपेश हे मोठे भाऊ नंतर मीरा,भारती या बहिणी तर हितेश हा लहानभाऊ आहे मीरा ही गोंदियात लग्न होऊन आलेल्या आहेत .त्यापैकी मोठी बहिन गोंदियात असते बघेल यांचे गाव रायपूरपासून २० किमी अंतरावर कुरूदडोह व बेलोदी हे आहेत