अवैध वाळू वाहतुक करणारे तीन ट्रॅक्टर पकडले

0
11

११ लाख ९ हजाराचा मुद्देमाल,११ आरोपी अटकेत
सडक अर्जुनी,दि.17- तालुक्यातील चुलबंध नदीतून चालू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करीत ३ ट्रक्टर जप्त करण्यात आले असून एकूण ११ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ही १६ डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
डुग्गीपार पोलिस ठाण्याच्या निशा वानखेडे आणि जितेंद्र चंदनबटवे गस्त घालित होते. दरम्यान,एम.एच. ३५-एजी ०३६२, एम.एच. ३५- जी-३५७५ आणि नवीन विना क्रमांक सोनालिका कं पनीचा ट्रॅक्टर विना परवाना वाळूची वाहतुक करीत असताना आढळून आल्याने तिन्ही वाहनांना पोलिस स्थानक डुुग्गीपार येथे जमा करण्यात आले. पोलिसांनी तिन्ही ट्रक्टरचे चालक आणि १२ हमाल यांच्याविरोधात गुन्हा भादवी ३७९/ ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत ११ लाख ९ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ११ जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई डुग्गीपारचे किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनात निशा वानखेडे आणि जितेंद्र चंदनबथवे यांनी केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

पाच एकरातील तणीस जळून खाक
कोहमारा- अज्ञात आरोपीने शेतशिवारात ठेवलेल्या पाच एकरातील तणसीच्या ढिगाºयाला आग लावल्याची घटना १६ डिसेंबर रात्री ९.३० वाजताच्या सुमारास सौंदड येथे घडली.
शेतकरी मधुकर देवराम चांदेवार यांची सौंदड गावाबाहेरील शेतशिवारात पाच एकराची तणीस ठेवली होती. त्या तणीची किंमत अंदाजे किंमत १५ हजार रुपये ऐवढी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वर्षभर जनावरांना लागणारा चारा जळल्यामुळे शेतकºयांसमोर जनावरांच्या चाºयाचा निर्माण झाला आहे.