अमृतसर ते रामेश्वरम सायकल यात्रेवर निघाले बैराग सिंघ फौजी

0
13

नांदेड़ , दि. १९ : – अमृतसर तालुक्यातील भूमा गावातील रहिवाशी असलेले बैराग सिंघ पिता फौजा सिंघ फौजी हे आपल्या वयाच्या 73 व्या वर्षी अमृतसर ते रामेश्वरम (तमिलनाडु ) यात्रेवर निघाले असून मंगळवारला (दि. 18)त्यांचे यात्रे दरम्यान नांदेडला आगमन झाले.सर्वधर्म समभावावर विश्वास ठेवणाऱ्या बैराग सिंघ उर्फ़ वैराग सिंघ यांची ही अकरावी सायकल यात्रा आहे. अमृतसर इथून त्यांनी 41 दिवसांपूर्वी त्यांनी यात्रेस सुरुवात केली आहे. बैराग सिंघ म्हणाले, माझे वडिल सैनेत होते. मी सुद्धा काही काळ सेनेत होतो,त्यामुळे माझ्यासाठी देश सर्वप्रथम आहे. देशात शांती नांदावी, बंधुत्व वृंध्दीगत व्हावे यासाठी मी वाहेगुरु समक्ष रोज प्रार्थना करतो. नांदेडला येऊन दर्शन घेतले आणि अरदास केली.आज बुधवारी पुढच्या यात्रेसाठी मी रवाना होणार आहे. येथून रामेश्वरम पोहचण्यासाठी मला वीस ते पंचवीस दिवस लागतील. त्या नंतर मला अमृतसर साठी वेगळ्या मार्गाने भ्रमण करायचे आहे. बैराग सिंघ हे रोज 80 ते 100 किलो मीटर चा प्रवास करतात. वृद्धत्वाला मात करीत त्यांनी यात्रा सुरु केली आहे.