लाच घेतांना शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे २ वैद्यकिय अधिकारी जाळ्यात

0
17

गोंदिया,दि.१९ः-येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील दंत विभागाचे सहाय्यक प्राध्यापक व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचे वैद्यकिय समन्वयक यांना आज १५ हजार रुपयाची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.तक्रारदार हा साहित्य पुरवठादार असून पुरविलेल्या साहित्याचे देयके मंजूर करण्यासाठी गैरअर्जदार यांनी २० टक्क्याप्रमाणे रकमेची मागणी केली होती.गैरअर्जदार डॉ.मqनदर तिलकंचद जांभुळकर हे शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात दंत विभागात सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत.तर दुसरे गैरअर्जदार डॉ.निखील मधुकर भरणे हे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य अभियानाचे वैद्यकिय समन्वयक पदावर कार्यरत आहेत.यांनी तक्रारदाराकडून अस्थीव्यंग रुग्णांना पुरविलेल्या आर्थोपेडिक साहित्याचे दोन महिन्याचे देयके मंजूर करुन देण्याची विनंती केली होती.तक्रारदाराचे दोन बिलाचे १ लाख २३ हजार ०६५ रुपये एवढी रक्कम होती.त्या रकमेच्या तुलनेत २० टक्याप्रमाणे २४ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.तक्रारदारास ती रक्कम देण्याची मूळीच इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १३ नोव्हेबंर रोजी तक्रार नोंदविली.त्या तक्रारीच्या आधारे पडताळणी केल्यानंतर आज १९ डिसेंबरला डॉ.मqनदर जांभुळकर यांच्याविरुध्द सापळा रचण्यात आला.त्यादरम्यान ७५हजार ५५२ रुपयाचे देयके काढून देण्याकरीता १५ हजार रुपयाची लाचेची मागणी करुन ती रक्कम डॉ.निखिल भरणे यांच्या मार्फेत पंचासमक्ष स्विकारल्याने दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस उपअधिक्षक रमाकांत कोकाटे,पोलीस हवालदार राजेश शेंद्रे,qदगबर जाधव,नितीन रहागंडाले,राजेंद्र बिसेन,गिता खोब्रागडे,वंदना बिसेन ,देवानंद मारबते यांच्या पथकाने केली.