आश्रमशाळेचे ४४ विद्यार्थी भारत भ्रमणासाठी रवाना

0
22

गडचिरोली,दि.21ः- आदिवासी विकास विभागांतर्गत जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी व भामरागड या तिन्ही प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेणारे ४४ विद्यार्थी भारत भ्रमणासाठी गुरूवारी रवाना झाले. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विद्यार्थ्यांच्या बसला हिरवी झेंडी दाखविली.
यावेळी जि.प. अध्यक्ष योगिता भांडेकर, नगराध्यक्ष योगिता पिपरे, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, नगरसेवक प्रमोद पिपरे, भामरागड प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी निरज मोरे, गडचिरोलीचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, अहेरीचे सहायक प्रकल्प अधिकारी श्रीकांत धोटे गडचिरोली प्रकल्प कार्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक डी.के. टिंगुसले, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, या भारत भ्रमण सहलीमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्याज्ञानात व महत्त्वाकांक्षेत निश्‍चितच वाढ होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची प्रकरणा मिळणार आहे. विद्यार्थ्यांना विमानाच्या प्रवासाचा अनुभवदेखील घ्यायला मिळणार आहे. विमानाने केलेला माझा पहिला प्रवास अजूनही आपणास अविमरणीय आहे. या भारत भ्रमण सहलीमध्ये आपण जे काही अनुभवाल ते परत आल्यानंतर आपल्या आर्शमशाळेतील इतर विद्यार्थ्यांमध्ये देवाण-घेवाण करावे, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढून अशा उपक्रमांना चालना मिळेल असे ते म्हणाले. यावेळी पोलिस अधीक्षक बलकवडे, प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनीही मार्गदर्शन केले.
या भारत भ्रमण सहलीत गडचिरोली प्रकल्पातील १५ मुले, ९ मुली, अहेरी प्रकल्पातील ६ मुले, ६ मुली, भामरागड प्रकल्पातील ४ मुले, ४ मुली असे एकूण ४४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नागपूर द्या २१ डिसेंबर रोजी सकाळी दिल्लीसाठी विमानाने प्रस्थान करणार्‍या ४४ विद्यार्थ्यांचा सात दिवसाच्या या भारत भ्रमण सहलीसाठी विद्यार्थ्यांच्यासोबत गडचिरोली सहा. प्रकल्प अधिकारी वंदना महल्ले, अहेरीचे प्रकाश जामठे, राजीव बोंगिरवार, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक सुधाकर गौरकर यांचा समोवश आहे.