संखच्या अप्पर तहसिलदाराने अवैध वाळूवाहतूक प्रकरणी ठोठावला दंड

0
9

संख(राजेभक्षर जमादार),दि.२१ः- येथील अप्पर तहसिल कार्यालयाच्यावतीने अनधिकृत गौणखनिज उत्खनन व वाहतुक रोखण्यासाठी २० डिसेंबरपासून धडक मोहीम सुरु केली असून सुमारे साडे सहा लाखाचा दंड वाहनधारकावर ठोठावला आहे.ही कारवाई उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे यांच्या मार्गदर्शनात अप्पर तहसिलदार डॉ.अर्चना पाटील यांच्या चमूने केली आहे.२० डिसेंबरला संख येथील हणमंत लोहार यांचे ट्रक्टर क्रमांक एझेडव्हीएसएफ५४८७७५८३ने अनधिकृतरित्या वाळूची वाहतूक करीत असताना पकडण्यात आले.सदर वाहनावर नव्या कायद्यानुसार १ लाख ४९ हजार ८९८ एवढा दंड ठोठावण्यात आला.तर २१ डिसेंबरला करण्यात आलेल्या कारवाईत सोनलगी येथील बोरनदीच्या पात्रात चेसीसन ००६५०४६५० व उमदी येथील बोर नदीच्या पात्रात डब्लूएससीई४५९२२९६९४३२ हे ट्रक्टर अनधिकृत रित्या वाळूची वाहतूक करतांना पकडून प्रत्येक ट्रक्टर मालकावर २ लाख ६३ हजार २६७ एवढा दंड ठोठावण्यात आला आहे.या कारवाईमध्ये तलाठी विशाल उदगिरे,बाळासाहेब जगताप,नितीन कुंभार,गणेश पवार,विलास चव्हाण,दुष्यंत पाटील,कोतवाल औदुंबर चव्हाण व पोलीस उपनिरिक्षक कोळी यांनी केली.