माजी आमदार कृष्णराव पांडव यांचे निधन

0
14
कृष्णराव पांडव यांनी राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले. १९६९ साली नगरसेवक पदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती.  १९७० साली ते नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेल्यानंतर ते नागपूर शहराचे उपमहापौर झाले. त्यांनतर कृष्णराव पांडव यांनी १९७३ साली शहराचे महापौर पद भूषवले.
नागपूर शहरात काँग्रेस पक्षाची मूठ बांधण्यात त्यांनी भरीव योगदान दिले. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. १९८२ ते १९९४ या कालावधीत महाराष्ट्र विधान परिषेदेचे ते सलग १२ वर्ष सदस्य होते. गेल्या काही वर्षांपासून कृष्णराव पांडव हे राजकीय जीवनापासून ते दूर असले तरी सामाजिक क्षेत्रात ते सक्रिय होते. आज (रविवारी) त्यांची अंत्ययात्रा दुपारी १२ वाजता धंतोली येथील निवासस्थानाहून निघणार आहे.