रिलायन्स हॉस्पिटलच्या गोंदियातीस कॅन्सर उपचार केंद्राचे लोकार्पँण

0
12
????????????????????????????????????

आरोग्य सुविधा सर्वांसाठी विशेषअधिकार असायला हवा – टीनाअंबानी,अध्यक्ष,रिलायन्सहॉस्पिटल्स

गोंदिया,दि.२३ :महाराष्ट्रात प्रगत ओन्कोलॉजी उपचार उपलब्ध करण्याच्या बांधिलकीच्या अनुषंगाने, रिलायन्स हॉस्पिटलने गोंदिया येथे नवे कॅन्सर उपचार केंद्र सुरू केल्याचे जाहीर केले आहे.या केंद्राचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,खासदार प्रफुल पटेल, रिलायन्स हॉस्पिटल्सच्या अध्यक्ष टीना अनिल अंबानी ,गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, खासदार मधुकर कुकडे,आमदार गोपालदास अग्रवाल,प्रकाश गजभिये,माजी मंत्री अनिल देशमुख,वर्षा पटेल,माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आले.अशाच प्रकारचे कॅन्सर केंद्र सोलापूर येथे लवकरच सुरू केले जाणार आहे.

महाराष्ट्रामध्ये १८ कॅन्सर केंद्रे सुरू करण्याची आणि सुरुवातीला त्यातील ३ केंद्रे सुरू करण्याची घोषणा ऑगस्ट २०१६ मध्ये करण्यात आली होती. रेडिएशन थेरपी देण्यासाठी या केंद्रांमध्ये अद्ययावत ट्रुबीम्रु मेडिकल लिनिअर अ‍ॅक्सिलरेटर उपलब्ध केले जाणार आहे.कॅन्सरवरील उपचारांच्या बाबतीत ही महाराष्ट्रातील एक मोठी विस्तार योजना आहे. रिलायन्स  हॉस्पिटल्सच्या अध्यक्ष टीना अनिल अंबानी यांनी सांगितले, ‘जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा ही फक्त सुखवस्तू वर्गासाठी  न  राहता, सर्वांसाठी विशेषअधिकार असायला हवे.या विचाराने आम्ही महाराष्ट्राच्या ग्रामीण व दूरवरच्या भागांमध्ये कॅन्सर केअर उपलब्ध करण्याच्या उद्देशानेही सुविधा सुरू केली आहे. या महिन्यात अकोला येथे असेच केंद्र सुरू केल्यानंतर गोंदिया येथे रिलायन्स हॉस्पिटल सुरू करणे, हे कॅन्सरला प्रतिबंधकरण्यासाठी त्याच्याशी लढण्यासाठी व त्यावर मात करण्यासाठी आम्ही ठरवलेल्या उद्दिष्टाच्या दिशेने टाकलेले एक मुख्य पाऊल आहे.रेडिएशन ओन्कोलॉजी चे राष्ट्रीय प्रमुख डॉ.कौस्तवतल पत्रायांनी सांगितले, ‘कॅन्सर हे सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीतले एक सर्वात मोठे आव्हान आहे आणि आम्ही वैद्यकीय गुणवत्तेच्या व जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाच्या आधारे या आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत. रुग्णाची सोय, खर्च व आरामदायीपणा याबाबतीत हे प्रिसिजन रेडिएशन अतिशय फायदेशीर आहे. जलद व अचूक उपचार देणारी ही सर्वात आधुनिक सुविधा आहे आणि त्यामुळे हा कार्यक्रम या प्रदेशातील कॅन्सर उपचारांमध्ये लक्षणीय बदल घडवणार आहे.सुत्रसंचालन डॉ.रामनारायन यांनी केले.

गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा व्याघ्र् प्रकल्प,मांडोबाई देवस्थान व हाजराफाॅल या निसर्गरम्य पर्यटनस्थळाचा विकास करण्यासाठी सुध्दा आम्ही पुढाकार घेणार असून गोंदिया जिल्ह्यातील हिरवेगार निसर्गाने मनमोहून टाकले आहे,तो हिरवेगारपणा टिकवून ठेवण्यासोबतच येथील या पर्यटनस्थळालाही मुबंईसारख्या शहरात आम्ही हायलाईट करणार अशी ग्वाही टिना अंबानी यांनी दिली.