आज साखरा येथे आंतरराष्ट्रीय शाळेचा शुभारंभ

0
22

वाशिम, दि. २४ : आज २५ डिसेंबर रोजी वाशिम तालुक्यातील साखरा येथे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेचा शुभारंभ सोहळा आयोजित केला आहे. राज्यात ज्या १३ आंतरराष्ट्रीय शाळांचा नामकरण शुभारंभ सोहळा आयोजित केला आहे त्यापैकीच साखरा येथील शाळेचा समावेश आहे.सकाळी १०.३० वाजता जि. प. आंतरराष्ट्रीय ओजस शाळा, साखरा येथे नामकरण सोहळा आयोजित केला आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते नामकरण शुभारंभ होईल. अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्षा हर्षदा देशमुख ह्या असतील तर प्रमुख अतिथी म्हणून गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, ऊर्जा राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री मदन येरावार, खा. संजय धोत्रे, खा. भावना गवळी, आमदार सर्वश्री गोपीकिशन बाजोरिया, श्रीकांत देशपांडे, लखन मलिक, राजेंद्र पाटणी, अमित झनक, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जि. प. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जि. प. शिक्षण व आरोग्य समिती सभापती सुधीर गोळे, महिला व बालकल्याण समिती सभापती यमुनाताई जाधव, समाज कल्याण समिती सभापती पानुताई जाधव, कृषि समिती सभापती विश्वनाथ सानप, शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर, वाशिम पंचायत समिती सभापती गजानन भोने, उपसभापती मधुबाला चौधरी, जि. प. सदस्य अनिल कांबळे, पं. स. सदस्य भगवान ढोके यांची उपस्थिती राहणार आहे.

साखरा येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शुभारंभ सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती, जि. प. आंतरराष्ट्रीय ओजस शाळा, साखरा यांनी केले आहे.