दगडाने ठेचून महिलेचा मृतदेह ठेवला रेल्वेरुळावर,2 आरोपी ताब्यात

0
13

गोंदिया,दि.25ः- शहरातील संजयनगर परिसरातील रहिवासी महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. शहरातील छोटा गोंदिया बायपास रस्त्यावरील पुला खाली रेल्वे रूळावर मंगळवारी (दि.२५) सकाळी तिचा मृतदेह मिळून आला. रामेश्वरी उर्फ बाली दिनेश शहारे (३४,रा.संजयनगर) असे मृत महिलेचे नाव आहे.दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक विवेक नार्वेकर यांनी तपास यंत्रणा फिरवीत 12 तासाच्या आत संशयीत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून दोघेही संजयनगर निवासी आहेत.

रामेश्वरी येथील एका हॉटेलात दररोज दुपारी २ ते रात्री १२ वाजतापर्यंत काम करीत होती. नेहमी प्रमाणे सोमवारी (दि.२४) दुपारी ती घरून कामावर गेली. परंतु रात्री घरी परतलीच नाही. मंगळवारी (दि.२५) सकाळी छोटा गोंदिया बायपास येथे रेल्वे रूळावर तिचा मृतदेह दिसून आला. तिचा चेहरा दगडाने ठेचलेला तिचा खून करून मृतदेह रेल्वे रूळावर टाकण्यात आल्याचे दिसले. तिचा गाडीने अपघात झाला असावा असे दाखविण्यासाठी आरोपीने तिचा मृतदेह रेल्वे रूळावर टाकल्याचे बोलले जात आहे. रामेश्वरीचा भाऊ विलास अनंतराम नागोसे (४०,रा. मूर्री) यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. रामेश्वरीला पती व दोन अपत्य असल्याचे सांगितले जाते. सदर घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विवेक नार्वेकर करीत आहेत